PUNE-DANAPUR AMRIT BHARAT TRAIN TO START FROM JUNE 27; CHECK ROUTE, TIMETABLE AND STOPS saam tv
क्राईम

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra To Bihar Bharat Train: दानापूर आणि पुणे दरम्यानची ही नवीन रेल्वे सेवा बिहार आणि महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. या ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम सुविधा मिळेल.

Bharat Jadhav

  • पुणे-दानापूर अमृत भारत ट्रेन 27 जूनपासून सुरू होणार.

  • महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार

  • कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रवाशांना थेट रेल्वे संपर्काचा लाभ.

महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दानापूर-पुणे अमृत भारत ट्रेन २७ जून रोजी सुरू होत आहे. ही अमृत भारत ट्रेन पुणे ते दानापूर दरम्यान धावेल. या ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम सुविधा मिळेल, गर्दीच्या मार्गावर एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या ट्रेनचा मार्ग, वेळ आणि थांबा कुठे-कुठे असणार याची माहिती जाणून घेऊ.

कधी धावणार अमृत भारत ट्रेन

भारतीय रेल्वे विभागाने नव्यानं सुरू केलेली नवीन अमृत भारत एक्स्प्रेसमुळे नोकरी, शिक्षणासाठी , व्यापारासाठी किंवा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बिहारला जातात, किंवा बिहारहुन महाराष्ट्रात येतात त्यांच्यासाठी ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे. नियमित रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतील.

आरक्षणासाठी गाडीचे क्रमांक ठेवा लक्षात

पुणे ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या 'अमृत भारत एक्सप्रेस'ला ११४३१ हा क्रमांक देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, दानापूर ते पुणे दरम्यान धावणारी गाडीचा क्रमांक ११४३२ असणार आहे. तिकीट आरक्षण करताना, गाडीची स्थिती तपासताना किंवा प्रवासाशी संबंधित माहिती मिळवताना प्रवाशांनी हे क्रमांक लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वेळापत्रक काय असेल?

ही गाडी दर शनिवारी दुपारी ३:२५ वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १:३० वाजता दानापूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन दर सोमवारी दुपारी ३:३० वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:०५ वाजता पुण्याला पोहोचेल. या वेळापत्रकामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन आगाऊ करणे सोपे जाईल. विशेष म्हणजे, ही गाडी २७ जून २०२६ रोजी सुरू होईल.

ट्रेन मार्गात या प्रमुख स्थानकांवर थांबेल

दानापूर-पुणे अमृत भारत एक्स्प्रेस प्रवासादरम्यान अनेक प्रमुख स्थानकांवर थांबेल. यामध्ये दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्टेशनवर ट्रेन थांबतील.

या ट्रेनमध्ये किती डबे असतील?

या 'अमृत भारत एक्सप्रेस'ला एकूण १८ डबे जोडले जातील. यामध्ये ८ स्लीपर क्लासचे डबे, ७ जनरल क्लासचे डबे, १ पॅन्ट्री कार आणि २ एसएलआर-डी (SLR-D) डबे यांचा समावेश असेल.

ट्रेन तिकीट कुठून बूक कराल?

या गाडीचे आरक्षण २२ जून २०२६ रोजी सुरू झाले. प्रवासी अधिकृत IRCTC संकेतस्थळ आणि RailOne ॲपचा वापर करून तिकिटे आरक्षित करू शकतात. यासह रेल्वेची चौकशीविषयक संकेतस्थळे आणि NTES ॲप हे गाडीच्या आगमनाच्या व प्रस्थानाच्या वेळा, तिची सद्यस्थिती (रनिंग स्टेटस) आणि इतर अद्ययावत माहिती पाहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT