Shruti Vilas Kadam
एक पिकलेले केळे आणि दोन चमचे मध एकत्र करून पेस्ट तयार करा. हा मास्क केसांना खोलवर मॉइश्चरायझेशन देतो आणि फ्रिझ कमी करतो.
दह्यामध्ये असलेले प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड केसांचे पोषण करतात. हेअर मास्कमध्ये दही घातल्यास केस अधिक मुलायम होतात.
मास्कमध्ये एक चमचा नारळाचे तेल मिसळल्यास केसांतील कोरडेपणा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.
तयार मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावून 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे पोषक घटक केसांमध्ये चांगले शोषले जातात.
मास्क काढताना गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाणी वापरा. यामुळे केस अधिक मऊ आणि चमकदार राहतात.
नियमितपणे आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरल्यास ड्रायनेस आणि फ्रिझीनेस हळूहळू कमी होण्यास मदत होते.
रासायनिक उत्पादनांऐवजी हा घरगुती उपाय वापरल्यास केस निरोगी, मजबूत आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसू लागतात.