RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Shruti Vilas Kadam

२५ हजार रुपयांपर्यंत भरपाईची तरतूद

डिजिटल फसवणुकीचे बळी ठरलेल्या पात्र ग्राहकांना आता आरबीआयकडून २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते.

Digital Payments | pinterest

ग्राहक संरक्षणाला प्राधान्य

ऑनलाइन बँकिंग, UPI, कार्ड व्यवहार आणि इतर डिजिटल पेमेंटमधील फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Digital Account

वेळेत तक्रार करणे आवश्यक

फसवणुकीची घटना घडल्यानंतर ग्राहकांनी शक्य तितक्या लवकर बँक किंवा संबंधित संस्थेकडे तक्रार नोंदवणे महत्त्वाचे आहे.

RBI | Saam TV

तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सोपी

ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यावर भर देण्यात आला आहे.

Digital Account

बँका आणि पेमेंट संस्थांवर जबाबदारी

डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षेच्या त्रुटी आढळल्यास संबंधित बँक किंवा पेमेंट सेवा पुरवठादारांनाही जबाबदार धरले जाऊ शकते.

Bank or Post Passbook | Yandex

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण

वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे.

Cyber Crime | yandex

सतर्क राहणे अजूनही आवश्यक

भरपाईची सुविधा उपलब्ध असली तरी OTP, PIN, UPI PIN किंवा बँकिंग माहिती कोणासोबतही शेअर न करणे आणि संशयास्पद लिंक टाळणे आवश्यक आहे.

Digital Payments India

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा