Thane district shaken after 65-year-old woman raped and murdered in Bhiwandi; police begin probe. Saam tv
क्राईम

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Beed Crime: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नवोली गावात जमीन आणि ट्रॅक्टरच्या वादातून एका मुलाने आपल्या वडिलांसह बहिणीवर हल्ला केला. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय.

Bharat Jadhav

  • जमीन आणि ट्रॅक्टर वादातून मुलाने वडील, बहीण आणि मेहुण्याला मारहाण.

  • बेल्ट आणि लोखंडी पाईपने अमानुष मारहाण केल्याचा आरोप.

  • वडिलांचे हातपाय बांधून गाडीत टाकून तलावात टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप.

विवाहितेवर अत्याचार करून तिला चावडीवर बांधण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना केज तालुक्यात घडली आहे. जमीन आणि ट्रॅक्टर नावावर करण्यासाठी मुलाने वडिलांसह बहीण आणि मेहुण्याला बेदम मारहाण केली आहे. बहीण आणि मेहुण्याच्या अंगावर चटणी टाकून लोखंडी पाईप आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. या प्रकरणात केज पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना केज तालुक्यातील नाव्होली गावात घडली आहे.

ट्रॅक्टरची चावी आणि जमीन नावावर करून दे म्हणत मुलाने सासरच्या लोकांना सोबत वडिलांना मारहाण केल्याची घटना नाव्हेली गावात घडली आहे. वडिलांना मारहाण केल्यानंतर त्यांचे हातपाय बांधून त्यांना गाडीत कोंबलं आणि त्यांना तलावात टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या मारहाणीचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. काल रात्री ८ ते ९ च्या दरम्यान ही घटना घडली असून जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात एका ऊसतोड मजुराला बागायतदारांकडून मारहाण झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारात ही मारहाणीची घटना घडली होती. ऊसाच्या वाढ्यात कांडी का ठेवतो. तुला ऊस नीट तोडता येत नाही, असं म्हणत ऊसतोड मजुराला बागायतदाराने लाथा- बुक्की आणि काठीने बेदम मारहाण केली होती.

मारहाण करत असताना त्याचा व्हिडिओही तयार करण्यात आला होता. गणेश बाळासाहेब वाघ अस ऊसतोड मजुराचे नाव आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

SCROLL FOR NEXT