Kidnapping  Yandex
क्राईम

Shocking News: परदेशात जाण्यासाठी रचला तरूणीनं स्वत:च्या अपहरणाचा बनाव; वडिलांकडे मागितली ३० लाखांची खंडणी,'असं'फुटलं बिंग

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमध्ये एका तरूणीनं स्वत:च्या अपहरणाची योजना आखल्याचं समोर आलं आहे. तिने फॉरेन ट्रिपसाठी वडिलांकडून खंडणी मागितल्याची घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

Girl Planned Own Kidnapping For Foreign Trip

कोटा येथे नीटची तयारी करणाऱ्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Crime News) विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणात राजस्थान पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. याप्रकरणी या तरूणीने स्वत:च आपल्या मित्रांसोबत मिळून अपहरणाचा कट रचला. वडिलांकडून ३० लाख रूपये खंडणी देखील मागितल्याचं समोर आलं आहे. या कारस्थानामागे धक्कादायक कारण असल्याचं समोर आलं आहे. (Latest Crime News)

फॉरेन ट्रिपला जाण्यासाठी तिला पैसे हवे होते. म्हणून तिने हा अपहरणाचा कट रचला आहे. अगदी एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे ही घटना आहे. ही तरुणी मूळची मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील (Girl Planned Own Kidnapping) बैराडची आहे. कथित अपहरणकर्त्या विद्यार्थिनीचे वडील रघुवीर धाकड यांना संदेश पाठवून खंडणी मागितली होती. तिचे हातपाय दोरीने बांधलेले फोटोही पाठवले होते. यामध्ये मुलगी संकटात असल्याचं दिसत होतं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वत:च्या अपहरणाचा कट रचला

एसपी अमृता दुहान यांनी प्रेस जनरलाल सांगितलं की, ही विद्यार्थिनी 3 ऑगस्ट 2023 रोजी तिच्या आईसोबत कोटा येथे आली होती. प्रकरणातील प्रत्येक पुरावा तपासल्यानंतर विद्यार्थ्यासोबत कोणत्याही (Kidnapping For Foreign Trip) प्रकारची अनुचित घटना घडली नाही, हे स्पष्ट झालं आहे. ही तरूणी तिच्या मैत्रिणींसोबत होती. पोलिसांना अद्याप विद्यार्थिनी आणि तिचा एक मित्र सापडलेला नाही. कुटुंबीय आणि प्रशासनाला विद्यार्थ्याच्या सुरक्षेची चिंता वाटत असल्याने त्यांनी कुठेही जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

या मुलीने तिच्या दोन मित्रांसह वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी हा कट रचला होता. तिला परदेशात जाण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे तिने हे पाऊल उचललं होतं. काव्या धाकड असं या 20 वर्षीय तरूणीचं नाव (Crime News) आहे. हे अपहरणाचे प्रकरण सोमवारी उघडकीस आलं. या तरूणीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुटका करण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागणारा संदेश फोनवर आल्याचा दावा केला होता.

माहिती देणाऱ्यास 20 हजार रुपयांचं बक्षीस

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना 18 मार्चच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कथित अपहरणाच्या तीन तास आधी, हे विद्यार्थी जयपूरच्या दुर्गापुरा रेल्वे स्थानकावर दिसले होते.फुटेजमध्ये ही तरूणी दोन मुलांसोबत फिरताना दिसत होती. कोटा पोलिसही तपासासाठी स्टेशनवर पोहोचले आहेत. (Kidnapping) सीसीटीव्हीच्या आधारे मुलीचं ठिकाण शोधलं जात आहे.

कोटा पोलिसांनी या तरूणीबद्दल माहिती देणाऱ्यास 20 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप परत आणण्यासाठी विनंती केली होती.त्यानंतर या प्रकरणाला आणखीनच जोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT