Crime News: प्रॉपर्टीच्या वादातून प्रेयसीची हत्या, गळा चिरून मृतदेह नदीत फेकला; पालघरमधील खळबळजनक घटना

Boyfriend killed Girlfriend: पालघरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Boyfriend killed Girlfriend
Boyfriend killed GirlfriendYandex

रूपेश पाटील

Palghar Crime News

पालघरमध्ये प्रॉपर्टीसाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसी लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर (Palghar Crime News) अशी बळजबरी करत होती. त्यामुळे वैतागून प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याचं समोर आलं आहे. (Latest Crime News)

पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेलं एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात पालघर पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड (Crime News) करण्यात आली आहे. आपण नक्की काय घडलंय, ते सविस्तर जाणून घेऊ या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रेयसीला संपवण्याचा निर्णय

सोलापूरमधील सुनील यादव याचं एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र, ही महिला सुनीलला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची जबरदस्ती करत होती. अखेर सुनील (Boyfriend killed Girlfriend) या प्रकारामुळे प्रचंड वैतागला अन् त्याने प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मित्राची मदत घेतली आणि योजना आखली.

लोणावळ्याला जाऊ असं सांगत या दोन्ही आरोपींनी मृत तरूणीला गाडीत बसवलं अन् घटनास्थळी आणलं. आरोपी सुनील यादव याने आपला साथीदार महेश बडगुजर याच्या मदतीने प्रेयसीची निर्घृण हत्या (Boyfriend killed Girlfriend For Property) केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडक शरीरापासून वेगळ केलं. तो मृतदेह वैतरणा नदीत फेकून दिला होता.

Boyfriend killed Girlfriend
Parbhani Crime News : नव्या दुचाकीसाठी सासरच्या मंडळींकडून त्रास, विवाहितेने उचललं टाेकाचं पाऊल; पूर्णा पाेलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याच्या घटना

मृतदेह सापडल्यानंतर पालघरच्या मोखाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी पोलीस तपास करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (killed Girlfriend For Property) आहे.

दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे . आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. प्रेमप्रकरणातून अनेकदा हत्या झाल्याच्या घटना घडतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील अशा घटना घडल्याचं पाहायला मिळतं.

Boyfriend killed Girlfriend
Uttar Pradesh Crime : जेवण द्यायला उशिर झाल्याने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या; पतीने नंतर स्वत:लाही संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com