Pune News: ड्रग्जविक्री करणाऱ्या 17 नायजेरियन नागरिकांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police Arrested Nigerian: पुणे पोलिसांनी 17 नायजेरियन नागरिकांना ड्रग्जविक्री प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटेपासून पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली आहे.
Pune News
Pune NewsYandex

Nigerian Selling Narcotics In Pune

पुणे शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या १७ नायजेरियन नागरिकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी 14 पुरुषांसह तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं (Drugs In Pune) आहे. पुण्यातील कोंढवा, येवलेवाडी, मांजरी, उंड्री आणि पिसोळी परिसरातून या नायजेरियन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Latest Crime News)

आज पहाटेपासून पुणे शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाकडून छापेमारी सुरू केली होती. या ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त करण्यात आलं (Nigerian Selling narcotics In Pune) आहे. आज पहाटेपासुन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू केली होती. या कारवाईमध्ये 17 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे पोलीस नायजेरीयन ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. आहेत. ड्रग्स पुरवणाऱ्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानी पोलीस छापेमारी करत (Pune Crime) आहेत. त्यामुळे पुणे शहरामध्ये एकच दाणादाण उडाली आहे. नायजेरीयन गँगच्या घरांवर पोलीसांनी आज पहाटे धाड टाकली होती.

पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील विविध भागात कारवाई केली आहे. त्यांनी कोंढवा, कात्रज, हडपसर, वानवडी या परिसरात असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानावर कारवाई (Police Crime Branch)केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे १० पथकांनी ही कारवाई केली आहे. नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू आहे.

Pune News
Uttar Pradesh Crime News: 'बायको आजारी आहे, ५००० द्या', म्हणत घरात शिरला अन् ३ चिमुकल्यांवर केले सपासप वार, दोघांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासूम पुणे शहरात अमली पदार्थांचा वावर वाढला आहे. पोलिसांना शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्ज प्रकरणाचे नॅशनल इंटरनॅशल कनेक्शन असल्याचं समोर (Nigerian Gangs Narcotics Case) आलं होतं. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी देशभरात छापे टाकले होते.

Pune News
Akola Crime: दीराच्या प्रेमात वहिनी वेडावली; नवऱ्याचा अडसर कायमचा दूर केला, बनाव रचला पण एका पुराव्यानं फसला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com