Gautam Gambhir post Kapil Dev video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. या व्हिडिओमुळे आपला कधी कधी गोंधळ उडत असतो. सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चिंतेत पडले आहेत.
काय आहे व्हिडिओ
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कपिल देव यांचे अपहरण झाल्याचं दिसत आहे. कपिल देव यांच्या तोंडाला पट्टी बांधण्यात आलीय. एका जुन्या घरात, मातीच्या फरशीवर वस्तू पडल्या आहेत आणि दोन व्यक्ती कपिल देव यांना घरात नेताना दिसत आहेत. कपिल देव मागे वळून पाहत आहेत असताना ते अपहरण करणारे त्यांना पुढे ओढत आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला असून अनेकजण गोंधळात पडले आहेत.
हा व्हिडिओ खरा आहे की खोटा असा संभ्रम होत आहे. कारण कपिल देव असे अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. परंतु या व्हिडिओवर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया देत देवाकडे कपिल देवाच्या सुरक्षेची प्रार्थना केलीय. यामुळे अनेकजण चिंतेत पडलेत.
व्हिडिओ खरा की खोटा
गौतम गंभीर यांनी या व्हिडिओवर चिंता व्यक्त केली असून त्यांनी तो व्हिडिओ X (आधीचे ट्विटर) या सोशल साईटवर पुन्हा पोस्ट केलाय. गंभीर यांनी व्हिडिओसोबत लिहिले की, हा व्हिडिओ आणखी कोणाला मिळाला आहे का? मला आशा आहे की, हा व्हिडिओ खरा नाही आणि कपिल भाऊ ठीक असतील. गंभीरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडिओ खरा असल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र या व्हिडिओबाबत लोकांनी विविध प्रकारचे मीम्सही बनवले आहेत. तसेच खेळाडूंना ट्रोल केले. अशा परिस्थितीत कोणीतरी हा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.