सायबर सिटी गुरुग्राममध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आहे. १३ मार्च रोजी ही घटना समोर आली होती. १३ मार्च रोजी गुरुग्रामच्या पालम पोलीस (Live In Partner Killed Woman) स्टेशनला चौमा गावात एका बांधकामाधीन इमारतीत महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. (Latest Crime News)
यावर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला अन् मारेकऱ्याला पकडलं. तेव्हा या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं (Live In Partner Killed) आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला हातोडा आणि बेल्ट जप्त करण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लिव्ह इन पार्टनरची केली हत्या
13 मार्च रोजी पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून चेहऱ्यावर जखमेच्या खुणा असलेला एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला होता. इमारतीच्या केअरटेकरच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवली (Egg Curry) होती. तपासादरम्यान पोलिसांनी घटनेच्या तीन दिवसांनंतर आरोपी लल्लन यादव (35 वर्षे) याला दिल्लीतील सराय काले खान येथून अटक केली होती.
पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो मूळचा बिहारचा आहे. सहा वर्षांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबाशी भांडण करून तो दिल्लीला पळून (Crime News) गेला. सात महिन्यांपूर्वी त्याची ओळख अंजली नावाच्या महिलेसोबत झाली होती. अंजली कचरा वेचण्याचे काम करत होती.
अंडाकरी बनवण्यावरून भांडण
ओळख झाल्यानंतर हे दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहू लागले. दोघेही मजुरीचे काम करत होते. ते दोघे १० मार्च रोजी गुरुग्रामला आले होते. येथे त्यांना एका व्यक्तीने मजुरांची गरज असल्याचं (Gurugram Crime) सांगितलं. काम मिळाल्याने ते दोघेही त्याच्यासोबत चौमा येथील त्याच्या बांधकामाधीन घरात आले.
त्यांच्याकडे राहण्यासाठी इतर कोठेही नव्हते. त्यामुळे ते बांधकाम सुरू असलेल्या घरात राहू लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लल्लनने १२ ते १३ मार्चच्या मध्यरात्री दारू प्यायली (Live In Partner Killed In Gurugram) होती. त्याने अंजलीला अंडाकरी बनवायला सांगितल्यावर तिने नकार दिला. या गोष्टीचा राग आल्यामुळे लल्लनने तिची हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी तेथून पळ (shocking) काढला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.