Manasvi Choudhary
2026 फॅशनमध्येही अनेक बदल झाले आहेत. सध्या तरूण मुले व मुली यामध्ये ओव्हरसाईज्ड कपडे घालण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
बॅगी स्टाईलमध्ये तुम्ही अनेक पॅटर्नमध्ये तुमचा लूक स्टायलिश आणि प्रेझेंटेबल करू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
फिटिंगच्या कपड्यांऐवजी ओव्हरसाईज्ड शर्ट्स, बॅगी जीन्स आणि मोठे ब्लेझर्स सध्या प्रचंड ट्रेडिंग आहेत.
डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे किंवा एकाच रंगाच्या विविध शेड्सचे कपडे घालणे ही देखीस स्टाईल तुम्ही ट्राय करू शकता.
अनेक खिसे असलेल्या सैल कार्गो पॅन्ट्स सध्या प्रचंड ट्रेडिंग आहेत. यामध्ये ऑलिव्ह ग्रीन, बेज आणि ब्लॅक रंग अधिक पसंतीस उतरत आहेत.
या जीन्स पायापाशी खूप लांब आणि सैल असतात, जणू काही त्या जमिनीवर पसरल्या आहेत. उंच मुला-मुलींवर हा पॅटर्न खूप उठून दिसतो.
मोठे आणि भडक प्रिंट्स असलेले ओव्हरसाईज्ड टी-शर्ट्स तरुणाईला फार आवडतात हा पॅटर्न देखील तुम्ही ट्राय करू शकता.