kotwali police charged three along with two women in for threatening former mla Saam Digital
क्राईम

माजी आमदाराकडं मागितली एक काेटींची खंडणी, 25 हजार घेताना एकास पकडले; दाेन महिलांवरही गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण

kotwali police charged three along with two women in for threatening former mla : बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह समाज माध्यमातून पत्रकारिता करणा-यास खंडणी मागितल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सुशील थाेरात

अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन एका माजी आमदाराला ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दाेन महिलांचा समावेश आहे अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील एका माजी आमदाराला तिघांनी खंडणी मागत पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू अशी धमकी दिली. संबंधित महिलांशी तडजोड करून देण्याची ऑफर देत खंडणीच्या रकमेपैकी २५ हजार रुपये अहमदनगरमधील एकाने स्वीकारल्याचे माजी आमदाराने फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान या प्रकरणा निमित्त अहमदनगरमध्ये समाज माध्यमातून चालविणा-या न्यूज चॅनेल्सच्या एका पत्रकाराचे कारनामे बाहेर आले आहेत. काही जणांकडून अनधिकृत न्यूज चॅनेलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये काही नागरिक फसले आहेत. केवळ बदनामीच्या भीतीने कुणी तक्रार देण्यास तयार होत नाहीत. प्रशासनाने अशा बोगस पत्रकारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे बनल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

SCROLL FOR NEXT