रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
कोल्हापूरमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका तरुणाचे त्याच्या सासऱ्याने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून ७ महिन्यांपूर्वी मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तरुणाची मिरज येथून सुटका केली आहे.
सात महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या भुयेवाडी येथे राहणाऱ्या विशाल आडसूळ या तरुणाची सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे राहणाऱ्या एका तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. या प्रेमविवाहाला मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरेचा विरोध होता.
शनिवार ८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास भुयेवाडी कमानीजवळून विशाल आडसूळची अज्ञातांनी चारचाकी कारमधून अपहरण केल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विशालचा शोध सुरु केला. त्याचे अपहरण हे श्रीकृष्ण कोकरे आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांनी मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून श्रीकृष्ण कोकरेला ताब्यात घेतले. पुढे त्याने गुन्हाची कबूली दिली. त्यानंतर मिरज कोर्टाच्या मागे असलेल्या एका फ्लॅटमधून पोलिसांनी विशालची सुटका केली. त्याला दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. शिवाय विशालला जबर मारहाण देखील करण्यात आली होती. जखमी अवस्थेत असताना त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणात पोलिसांनी श्रीकृष्ण कोकरे याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित ४ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ताब्यात घेतलेल्यांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार, एक मोटरसायकल असा ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.