Maharashtra Politics : रायगडच्या DPDC बैठकीत 'दादा'गिरी? शिंदे गटाला डावलून अजित पवारांची बैठक? महायुतीत शिंदे गटाला धक्क्यांवर धक्के

Ajit Pawar Meeting : पालकमंत्रिपदावरून तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रायगड डीपीडीसी बैठक घेतल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. शिंदे गटाच्या आमदारांसोबत अजितदादांनी नेमकं काय केलं? कशामुळे वाद वाढला? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Saam Tv
Published On

Maharashtra Politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही मिटायला तयार नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना अजित पवारांनी रायगडच्या डीपीडीसीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

मात्र शिंदे गटाचा कोणताही आमदार या बैठकीला नव्हता. बैठकीचं निमंत्रणच नसल्यामुळे उपस्थित नसल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवेंनी केलाय. त्यामुळे हा वाद आणखीनच चिखळलाय. तर आपल्याला निमंत्रण होतं मात्र पूर्वनियोजित कामामुळे बैठकीला हजर नसल्याचं शिंदे गटाच्याच भरत गोगावलेंनी सांगितलंय.

Maharashtra Politics
Lakhpati Didi Yojana : लाडकी बहीणनंतर आता 'लखपती दीदी', फडणवीस सरकार राज्यात राबणार नवी योजना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. बैठकीला तिनही आमदार गैरहजर असल्याने पालकमंत्री पदावरून पुन्हा तिढा निर्माण झाला आहे का अशी चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी केली जातेय का पाहूया...

Maharashtra Politics
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहबादियावर 'शक्तिमान' भडकला, म्हणाला, त्याचं तोंड काळं करा अन् गाढवावरुन फिरवा!

शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी?

- एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द

- एसटी महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करुन सरनाईकांना झटका

- उद्योग खात्यात मंत्र्यांना बायपास करुन अधिकाऱ्यांचे परस्पर निर्णय

- डीपीडीसी बैठकीत जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रण नाही?

तर पालकमंत्रिपदावरून वाद अजूनही कायम असल्याचं मान्य करत अजितदादांनी घेतलेल्या बैठकीवर मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सारवासारव केलीय.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद शिगेला असताना अजित पवारांनी डीपीडीसीची बैठक घेतली. मात्र या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांना निमंत्रण न दिल्यामुळे या वादात आणखीन तेल ओतलं गेलं. तर दुसरीकडे भरत गोगावलेंना निमंत्रण दिले.

Maharashtra Politics
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची जीभ छाटणाऱ्याला ५ लाख; वादग्रस्त विधानावरून एन्फ्ल्यूएन्सरचीच वादग्रस्त घोषणा

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनंही केली. शिवसेनेचे जिल्ह्यातील तिन्ही आमदार तटकरे यांच्या विरोधात आक्रमक झाले.अद्याप महायुतीचे तिन्ही प्रमुख नेत्यांनी या वादावर तोडगा काढलेला नाही.अशातच ही बैठक पार पडल्याने पुन्हा आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद वाढणार की यावर अजितदादा आणि शिंदे तोडगा काढून महायुतीतील वाद मिटवणार हेच पाहायचं.

Maharashtra Politics
Accident News : खड्ड्यात आदळली बाईक, तोल गेला अन् महिलेचं डोकं रस्त्यावर आपटलं, हातही मोडला | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com