Accident News : खड्ड्यात आदळली बाईक, तोल गेला अन् महिलेचं डोकं रस्त्यावर आपटलं, हातही मोडला | VIDEO

Ulhasnagar Accident Video : उल्हासनगरमधील एका रस्त्यावर बाईकचा अपघात झाला. बाईक खड्ड्यामध्ये आदळल्याने महिलेला दुखापत झाली. यात महिलेच्या डोक्याला मार बसला आणि हात फ्रॅक्चर झाला.
Ulhasnagar Accident Video
Ulhasnagar Accident VideoSaam Tv
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

रस्त्याच्या खड्यात बाईक आदळल्याने अपघात झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. खड्ड्यामुळे बाईकवर बसलेली महिला खाली पडली. तिच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची घटना रस्त्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील टील्सन मार्केट परिसरात ही घटना घडली आहे. हा अपघात रात्री दहाच्या सुमारास झाला. बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा अपघात कैद झाला. या व्हिडीओमध्ये एक महिला बाईकवरुन तोल गेल्याने खाली रस्त्यावर उलटी पडल्याचे पाहायला मिळते.

एक तरुण त्याच्या आईला आणि लहान मुलीला बाईकवरुन घेऊन जात होता. दरम्यान रस्त्यावरच्या एका खड्ड्यात त्याची बाईक आदळली. तोल गेल्याने मागे बसलेली त्याची आई डोक्यावर रस्त्यावर पडली. डोकं रस्त्यावर आदळल्याने तरुणाच्या आईच्या डोक्याला मार बसला. तसेच त्यांचा हातदेखील फ्रॅक्चर झाला.

Ulhasnagar Accident Video
Aaditya Thackeray : BMC साठी तुम्ही काय विचार केलाय? आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगाप्लॅन

उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी खोदकाम सुरु आहे. मलनि:सारण वाहिनी टाकण्यासाठी अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. पण मलनि:सारण वाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर रस्ते पूर्ववत केले जात नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. दरम्यान या अपघाताची दखल घेत उल्हासनगरमधील रस्त्यांची स्थिती सुधारली जाईल अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली जात आहे.

Ulhasnagar Accident Video
Badlapur Accident : बदलापूरात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची डंपरला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com