FATHER KILLS DAUGHTER OVER LOVE AFFAIR | SHOCKING KARNATAKA CRIME CASE Saam Tv
क्राईम

Shocking : भयंकर! कामासाठी शेतात बोलावून बापानेच केली लेकीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Karnataka Crime News : कर्नाटकातील धक्कादायक प्रकरणात बापानेच आपल्या मुलीची प्रेमप्रकरणावरून हत्या केल्याचे उघड झाले आहे. बेपत्ता प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली.

Alisha Khedekar

  • कर्नाटकात बापानेच मुलीची हत्या केल्याचे उघड

  • प्रेमप्रकरणावरून वाद झाल्याची माहिती

  • आरोपीने गुन्हा कबूल; पोलिसांनी अटक केली

  • बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना सत्य समोर आले

Karnataka Murder News बंगळूरमधून बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या बाप लेकीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. बापानेच मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यानंतर मुलीला जमिनीत गाढून आरोपी बाप घटनास्थळावरुन फरार झाला. त्या दोघांमध्ये मुलीच्या प्रेमप्रकरणावरून वाद झाला होता, या वादातून आरोपीने हे पाऊल उचलले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी तिम्मरायप्पाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव मेघना असे असून आरोपीचे नाव तिम्मरायप्पा (वय ४८)असे आहे. तिम्मरायप्पा हा सिरा तालुक्यातील निम्बेमरदहल्ली गावातील रहिवासी आहे. तो एक शेतकरी आहेत. तिम्मरायप्पाला एक मुलगी आहे. मेघनाचे एका मुलावर प्रचंड प्रेम होते. त्याची कबुली देखील तिने आई वडिलांना दिली होती. मेघना ज्या मुलावर प्रेम करत होती तो मुलगा तिच्या आईच्या माहेरच्या नात्यातला होता. मेघनाला त्याच्यासोबतच लग्न करायचे होते. तिम्मरायप्पाला हे समजताच तो संतापला.

१६ एप्रिल रोजी आरोपीने मेघनाला त्यांच्या शेतावर कामासाठी बोलावले. संतापलेल्या तिम्मरायप्पाने मुलीची गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर तिला विहरीत फेकून दिले आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मध्यरात्री अंधाराचा फायदा आरोपीने मुलीचा मृतदेह जमिनीत गाडला. काही दिवसांनी तिम्मरायप्पाने घरातून पळ काढला. बरेच दिवस तो परत आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता तपास सुरु केला. या तपासा दरम्यान पोलिसांनी १५ मे रोजी आरोपीला एका गावातून ताब्यात घेतले.पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल केला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT