Kalyan News Saam tv
क्राईम

Kalyan Crime News : दिवाळीच्या आनंदात मिठाचा खडा! फटाक्यांचा वाद टोकाला गेला, एकमेकांच्या डोक्यात फोडल्या कुंड्या

Kalyan News : कल्याणमध्ये फटाक्यांवरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. या झटापटीत काही तरुण जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

कल्याणच्या चिकणघर परिसरात फटाक्यांवरून दोन गटांमध्ये मोठा राडा झाला

या झटापटीत काही तरुण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे

पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून परिस्थिती नियंत्रणात आणली

दिवाळी सणात वाढत्या हिंसाचारामुळे नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

दिवाळी सणाच्या उत्सवात कल्याणमध्ये मिठाचा खडा पडल्याचे समोर आले आहे. फटाके फोडण्याच्या शुल्लक कारणांवरुन दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या चिकणघर परिसरात काल उशिरा रात्री दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. फटाके फोडण्यास विरोध केल्याने हा वाद झाल्याचे समोर आले आहे. हा वाद इतका वाढला की, या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या झटापटीत काही जणांनी एकमेकांवर बाजू;ला असलेल्या कुंड्या फोडल्या. या मारामारीत काही तरुण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी पोहचून दोन्ही गटातील वाद सोडवला. पोलिसांनी दोन्ही गटांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कल्याणामध्ये दिवाळी सणाचा आनंद हिंसाचारात बदलल्याच्या अनेक घटना मागील दोन तीन दिवसात समोर आल्या असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आणि शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजला

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् १ लाखांची पेन्शन मिळवा

Phaltan Doctor Death : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा | VIDEO

Hingoli Crime : साताऱ्यानंतर हिंगोली हादरली, महिलेवर बलात्कार; पोलिसांची चूक वाचून संतप्त व्हाल

Sanjay Shirsat: ४ वेळा आमदार राहिलो आता बस झालंं; महायुतीच्या मंत्र्याकडून निवृत्तीचे संकेत|VIDEO

SCROLL FOR NEXT