Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?
Mumbai Crime NewsSaam Tv

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Mumbai Kalachowki News: मुंबईतील काळाचौकी परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाने तरुणीवर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. तरुणी गंभीर जखमी असून तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published on
Summary

काळाचौकी परिसरात दिवसाढवळ्या तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला

हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या

तरुणी गंभीर जखमी असून केईएम रुग्णालयात दाखल

प्रेमसंबंधातील वादातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

मुंबईतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील काळाचौकी येथे दिवसाढवळ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. धक्कदायक म्हणजे या हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वतःचे जीवन संपवले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी परिसरात आज दिवसाढवळ्या एका तरुणाने तरुणीचा पाठलाग केला. यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर तरुणाने तरुणीवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तरुणी जवळच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये शिरली. आरोपी तरुणाने तिचा पाठलाग करत नर्सिंग होममध्ये जाऊन तिच्यावर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली.

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?
Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपीने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणीला जवळच्या केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?
Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण आणि तरुणी काही काळापासून प्रेमसंबंधात होते. हा चाकू हल्ला प्रेमसंबंधांच्या संशयावरून झाला असल्याचा संशय आहे. दरम्यान या दोघांची अद्याप ओळख पटली नसून पोलीस याचा सविस्तर तपास करत आहेत. मात्र या तरुणाने तरुणीवर का हल्ला केला ? हे अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलींच्या सुरक्षितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com