Kalyan Crime  Saam tv
क्राईम

Kalyan Crime : हॉस्पिटलच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याला लुबाडले, लाखो रुपये उकळले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan News : कल्याण पश्चिमेत ५० खाटांचं हॉस्पिटल सुरू करण्याच्या आमिषाने डॉक्टर प्रसाद आणि वैशाली साळी दाम्पत्याने तब्बल ७० लाखांची फसवणूक केली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • ५० खाटांचं हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवून ७० लाखांची फसवणूक.

  • डॉक्टर प्रसाद व वैशाली साळी यांच्यावर गुन्हा दाखल.

  • एक वर्ष उलटलं तरी ना हॉस्पिटल सुरू, ना पैसे परत.

  • पीडित डॉक्टर आणि फार्मासिस्टनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

कल्याणमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ५० खाटांचे हॉस्पिटल सुरु करतो सांगून एका दाम्पत्याने डॉक्टर नवरा बायकोला ७० लाखांना लुबाडलं आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही या दाम्पत्याने ना हॉस्पिटल सुरु केले ना पैसे परत केले. या घटनेनंतर फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आहे. या आरोपींची नावे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० खाटांचं हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली.

डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये आरोपी दाम्पत्याने “हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी” असा सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं आश्वासन दिलं. या बहाण्याने त्यांनी ८० लाख मागितले होते, मात्र दोघांनी मिळून ७० लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे दिली.

साळी दाम्पत्याने तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचं वचन दिलं होतं. मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झालं नाही आणि पैसेही परत केले नाहीत. याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात लेखी करार व कागदोपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली.

या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.दरम्यान, फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूग्णालयातून पळून घरी आला, दुसऱ्या दिवशी रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळला; सांगलीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचलं

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती

भगव्या शालीवरून कोकणात वाद पेटला; नितेश राणे विरुद्ध उदय सामंत|VIDEO

CBSE Class 10 Exam Pattern Change : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, प्रमुख विषयांच्या परीक्षेत महत्वाचे बदल, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT