kalyan railway station Saam tv
क्राईम

kalyan : कल्याण रेल्वे स्थानक तिकीट काउंटरवर मोठा घोटाळा, अधिक शुल्क आकारून होत आहे प्रवाशांची लूट

kalyan Railway Station scam : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिकीट कर्मचाऱ्याकडून प्रवाशाची सर्रासपणे लूट होत आहे.

Saam TV News

ठाणे (कल्याण) : नालासोपारा इथे राहणारा धिरज विश्वकर्मा यांना कुंभमेळ्यानिमित्त प्रयागराज येथे जायचं होतं. प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढायचे असल्याने ते कल्याण रेल्वे स्थानकात गेले. तिथे गेले असता त्यांनी पाहिलं की तिकीट खिडकीवरील कर्मचारी हा प्रत्येक प्रवाशाकडून जादा पैसे उकळत होता. हा रेल्वे कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून 30 रुपये अतिरिक्तचे घेत होता. काही प्रवाशांनी त्याला विचारले असता तो त्यांना उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागला.

तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांना फक्त तिकीटवरील आहे तितकीच रक्कम घेण्याचा अधिकार असतो. ते प्रवाशांकडून कोणतीही जादा रक्कम आकारू शकत नाही. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनवरील एका तिकीट काउंटरवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. इथे एका तिकीट काउंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे ३० रुपये जादाचे घेताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये जर तुम्ही बघितले, एक प्रवासी तिकीट काउंटरवर नेत्रावली एक्स्प्रेस या ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरवर गेला असता. यावेळी त्याच्या लक्षात आले की, तिकीट काउंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे ३० रुपये अधिकचे घेतोय. यावरून तो त्या एका कर्मचाऱ्याला विचारतो की, तुम्ही प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे ३०-३० रुपये जास्त का घेत आहात? त्यावर तो कर्मचारी आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव, असे म्हणत त्याचे ३० रुपये परत करतो. पण, त्याने अशा प्रकारे याआधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ३० रुपये अधिकचे वसूल केले होते.

त्यामुळे प्रश्न विचारणारा प्रवासी परत तोच प्रश्न विचारतो, आधी तुम्ही दोन जणांकडून अधिकचे पैसे घेतले आणि आता या प्रवाशाकडूनही घेत होता. त्यावर तो कर्मचारी त्या प्रवाशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत बाजूला सरकण्यास सांगतो आणि त्यानंतर चुकून झाले असे बोलतो. त्यावर प्रवासी त्याला पुन्हा एकदा विचारतो की तुमच्याकडून हे एकदा किंवा दोनदा चुकून होऊ शकते. पण नेहमी का होतेय? यावर तो कर्मचारी आपली चूक लपवण्यासाठी काहीच उत्तर न देता प्रवाशालाच काउंटरवरून बाजूला होण्यास सांगतो. पण, तो प्रवासी बाजूला न होता, वारंवार त्याला विचारतो की, चूक एकदा होऊ शकते ना; वारंवार कशी होऊ शकते. यावर तो कर्मचारी तुझ्याकडून तर अधिकचे पैसे घेतले नाही ना, असे उलट उत्तर देतो.

त्यावर ज्या प्रवाशाकडून कर्मचाऱ्याने ३० रुपये अधिकचे घेतले, तो संतापून म्हणतो की, मी मागितल्यावर तू माझे ३० रुपये परत दिले. अशा प्रकारे कर्मचाऱ्याने एकामागून एक आलेल्या तीन प्रवाशांकडून प्रत्येकी ३० रुपये जास्तीचे घेतले. कल्याण रेल्वे स्टेशन तिकीट काउंटरवरील हा कर्मचारी प्रयागराजचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एका तिकीटमागे ३० रुपये अधिकचे वसूल करीत असल्याचा दावा व्हिडीओ शूट करणाऱ्या प्रवाशाने केला. पण तो फक्त प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडूनच अशाप्रकारे अधिकचे पैसे वसूल करतोय की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT