kalyan crime news saam tv
क्राईम

Kalyan Crime: रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांना हेरायचे, मोबाईल, लॅपटॉप घेऊन पसार व्हायचे.. २ सराईत चोरटे गजाआड

Kalyan Latest News: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्काय वॉक झोपले असताना एका शिक्षकाची बॅग चोरीला गेली होती.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी

Kalyan Crime News:

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात झोपलेल्या प्रवाशांचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अमोल माने आणि किरण पाटील असे या चोरट्यांचे नाव असून या दोघांनी या आधी किती चोरा केल्यात? याचा तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत. (Crime News in Marathi)

समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्काय वॉक झोपले असताना एका शिक्षकाची बॅग चोरीला गेली होती. या बागेत फिर्यादी शिक्षकाचे काही महत्त्वाची कागदपत्रे आणि महागडा लॅपटॉप होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करत अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांची ओळख पटवली. हा चोरटा आंबिवली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत अमोल माने या चोरट्याला बेड्या ठोकल्या. या चोरट्याकडून चोरी केलेला लॅपटॉप व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.

तसेच दुसऱ्या एका घटनेत प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता. याचा तपास करत रेल्वे पोलिसांनी किरण पाटील या तरुणाला मुरबाडहुन अटक केली. हे दोघेही सराईत चोरटे आहेत. या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस घेण्याची शक्यता असून अर्चना दुसाने, पोलीस अधिकारी संजय खोंदे, प्रमोद देशमुख यांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT