MINDA COMPANY MURDER CASE: TWO COLLEAGUES KILL SENIOR EMPLOYEE, SHOCKING REASON REVEALED saam tv
क्राईम

Kalyan Crime: मिंडा कंपनीत खळबळजनक घटना; २ सहकाऱ्यांनी केली वरिष्ठ कर्मचाऱ्याची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Kalyan Crime: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मामनोली गावाजवळील जंगल परिसरात ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्ती मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली.

  • मृतदेह मामनोली गावाजवळील जंगल परिसरात सापडला.

  • कल्याण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला.

विकास काटे, साम प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या एका हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय. कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर रस्त्यावरील मामनोली गावाच्या जंगलात एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. कल्याण तालुका पोलिसांनी खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यानंतर या हत्येमागील धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांमधून सहा विशेष पथके तयार करण्यात आली होती. पोलीस तपासात जंगलात आढळलेला मृतदेह हा मिंडा कंपनीतील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याचा असल्याचं निदर्शनात आले.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मिंडा कंपनीतील सौरभ विश्वनाथ गोलहे (२४) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रेय कांठे (२८) यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली. त्यात दोघांनीही खुनाची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार दोन्ही आरोपींनी वैयक्तिक कारणांमुळे आणि एकमेकांबद्दलच्या द्वेषामुळे मृत व्यक्तीला जंगलात नेऊन त्याचा खून केला.

हत्येनंतर त्यांनी मृतदेहावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि ओळख किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकून दिला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस आता या हत्येच्या प्रत्येक पैलूचा आणि इतर संभाव्य हेतूंचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT