Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Police Raid On Lodge: धुळे येथील एका लॉजवर देवपूर पोलिसांनी अचानक छापा टाकला. येथे एकाच खोलीत २० तरुण-तरुणी आढळून आले. या धक्कादायक प्रकारामुळे संशयास्पद बेकायदेशीर कृत्यांबाबत तपास सुरू करण्यात आलाय.
Police Raid  On Lodge:
DHULE LODGE RAID: 20 BOYS AND GIRLS FOUND IN SINGLE ROOM, POLICE ACTION CREATES STIRAI Image
Published On
Summary
  • धुळे शहरातील देवपूर परिसरातील राधाकृष्ण लॉजवर पोलिसांनी अचानक धाड टाकली.

  • लॉजच्या एका खोलीत 20 मुलं-मुली आढळल्याने खळबळ उडाली.

  • संशयास्पद हालचालींच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या 'एका लॉज'वर देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीनंतर एक भयानक प्रकार उडकीस आलाय. लॉजच्या एका रुममध्ये २० मुलं-मुली असल्याचं आढळून आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे धक्कादायक बाब समोर आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय.

Police Raid  On Lodge:
तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

धुळ्यातील देवपूर परिसरातील जीटीपी स्टॉपजवळ हे राधाकृष्ण लॉज आहे. काही दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीर आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी या अवैध प्रकाराबाबत देवपूर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अचानक धाड टाकून ही धडक कारवाई केली.

Police Raid  On Lodge:
FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

पोलीस पथकाने लॉजमध्ये धाड टाकली तेव्हा तेथील संतापजनक प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं. कारवाईदरम्यान पोलिसांनी सांगितलं की, ताब्यात घेतलेले सर्व मुल-मुली हे २० वर्षांवरील आहेत. भविष्यात त्यांनी अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये पुन्हा सहभाग घेऊ नये आणि त्यांना योग्य समज मिळावी, यासाठी त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावलं. पालकांना योग्य ती समज देऊन या तरुण-तरुणींना सोडण्यात येईल.

गेल्या काही काळापासून देवपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय तसेच संशयास्पद कॅफेचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय.या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. अशा बेकायदेशीर लॉज आणि कॅफेवर भविष्यातही कडक कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com