Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: धक्कादायक, कोयत्याचा धाक दाखवत अल्पवयीन मुलांनी लुटली पानटपरी, दोन मुले पोलिसांच्या ताब्यात

Kalyan Crime News: कोयता हातात घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरी चालकाला मारहाण करत लुटल्याची घटना कल्याण पूर्व चिंचपाडा, म्हात्रे नाका परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे.

Sandeep Gawade

Kalyan Crime News

कोयता हातात घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरी चालकाला मारहाण करत लुटल्याची घटना कल्याण पूर्व चिंचपाडा, म्हात्रे नाका परिसरात घडली होती. ही मारण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला . या प्रकरणी पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. या प्रकरणातील आणखी दोन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या मधील दोघांविरोधात आधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

याआधी देखील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र अल्पवयीन आरोपींवर कारवाई करण्यात मर्यादा येतात नेमक्या याच परिस्थितीचा फायदा अल्पवयीन आरोपी उठवू लागल्याचे दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी हातात कोयता घेऊन तरुणांच्या टोळीने एका पानटपरीवर सामानाची नासधूस केली. तसेच टपरी चालकासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व येथील चिंचपाडा म्हात्रे नाका परिसरात घडली होती. हातात कोयता घेतलेल्या तरुणांची दहशत सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दहशत माजवत लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांचे साथीदार पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कल्याण डोंबिवलीत कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. परंतु गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT