kalyan Crime News Saam Digital
क्राईम

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

kalyan Crime News Update : १४ वर्षीय मुलीचा भाऊ आणि काकावर हल्ला केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मुलीशी लग्न करायचं होतं. पण तिच्या कुटुंबीयांनी त्याचा प्रस्ताव धुडकावला होता.

साम टिव्ही ब्युरो

रात्री ११ ची वेळ. परिसरात भयाण शांतता. पोरगा तावातावानं मुलीच्या घरी गेला. मुलगी अल्पवयीन, तरीही त्या तरुणानं तिला लग्नासाठी मागणी घातली. मुलीच्या कुटुंबीयांनी नकार कळवला. पोरानं थेट भांडण उकरून काढलं. तो संतापला. रागानं त्यानं मुलीच्या कुटुंबीयांवरच जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. हा सगळा थरार कल्याण पश्चिमेकडील आंबेडकर रोड परिसरात घडला.

१४ वर्षीय मुलीचा भाऊ आणि काकावर हल्ला केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मुलीशी लग्न करायचं होतं. पण तिच्या कुटुंबीयांनी त्याचा प्रस्ताव धुडकावला होता. १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत कल्याण पश्चिमेच्या (kalyan)आंबेडकर रोड परिसरात राहते. संशयित आरोपी तरुण त्याच परिसरात राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही भयंकर घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. मोमीन तावातावाने मुलीच्या घरी पोहोचला. जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर मी स्वतःचं बरंवाईट करून घेईन अशी त्यानं धमकी दिली. त्यानं तिच्या कुटुंबीयांकडं लग्नास परवानगी मागितली. पण त्यांनी नकार कळवला. त्यावर मोमीन आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला. मोमीनने तिच्या भावाला आणि काकाला मारहाण करण्यास सुरुवात केली, असंही पोलिसांनी सांगितलं.

आरोपी मोमीननं आपल्यासोबत चाकू आणला होता. त्या चाकूनेच दोघांवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्वतःही हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोमीननं केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना (Bazarpeth Police Station) देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. मुलीच्या कुटुंबीयांना रुग्णालयात नेले.

या प्रकरणी मुलीच्या आईनं पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर आरोपी तरुणानंही मुलीच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT