Kalyan doctor couple’s anticipatory bail rejected in ₹70 lakh pharmacy fraud case. 
क्राईम

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Kalyan Scam Case : कल्याणमध्ये ७० लाख रुपयांच्या फार्मसी फसवणूक प्रकरणातील आरोपी डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने दणका दिलाय. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय.

Bharat Jadhav

  • फसवणूक प्रकरणात डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाचा मोठा धक्का

  • न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय.

  • डॉक्टर दाम्पत्यानं फार्मसी व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक केली.

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज

कल्याणमध्ये फार्मसी व्यवसायाच्या नावाखाली तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांना सामोरे जात असलेल्या डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. प्रसाद यादवराव साळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साळी यांच्यावर अटकेची नामुष्की ओढवण्याची शक्यता अधिक बळावली आहे. कल्याण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश परवीन सय्यद यांच्या न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला.

कल्याण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश परवीन सय्यद यांच्या न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड करत असून त्यांनी न्यायालयासमोर अटकपूर्व जामीनास जोरदार विरोध नोंदवला. तपासासाठी आरोपींच्या अटकेची आवश्यकता असल्याचेही त्यांनी न्यायालयास सांगितले.

तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅडव्होकेट हरीश हरिदास नायर यांनी फसवणुकीचे गंभीर स्वरूप स्पष्ट करत जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली.तर आरोपींच्या वतीने अ‍ॅडव्होकेट अमरेश जाधव यांनी बचाव पक्षाची भूमिका मांडली. दोन्ही बाजूंनी सविस्तर युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायालयाने डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत तपासाला गती मिळाली आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर डॉ. प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांच्या अटकेची शक्यता अधिक निश्चित मानली जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करण्यास सज्ज असून तपास अधिक पुढे जाण्याची अपेक्षा आहे.फसवणूक प्रकरणात या निर्णयामुळे कल्याणमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT