jalna police arrests 3 in kids case  Saam Digital
क्राईम

जालना पाेलिसांची धडाकेबाज कामगिरी, 5 काेटींसाठी अपहरण झालेल्या मुलाची 6 तासांत केली सुटका, तिघांना अटक

jalna police arrests 3 in kids case : जालना गुन्हे शाखेच्या जिगरबाज पाेलिसांनी मुलाच्या अपहरणाचा कट अवघ्या 6 तासांत उधळला. अप्पर पाेलिस अधिक्षक आयुष नाेपाणी यांनी दुचाकीवरुन पथकाच्या साह्याने कामगिरी फत्ते केली.

Siddharth Latkar

- अक्षय शिंदे

जालना शहरातील एका विद्यार्थ्याचे अपहरण केल्यानंतर त्याच्या पालकांकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव पाेलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक करुन 6 तासांत मुलाची सुटका केल्याने पाेलिसांवर काैतुकाचा वर्षाव हाेऊ लागला आहे.

जालना शहरातील कालीकृती भागामध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या एका 11 वर्षीय मुलाचं मंगळवारी काही लाेकांनी अपहरण केली. त्याला एका चार चाकीतून घेऊन गेले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली.

या घटनेची माहिती मुलाच्या पालकांनी पाेलिसांना दिली. पाेलिसांनी पालकांना धीर दिला. विविध ठिकाणी पाेलिसांची पथके मुलाच्या शाेधासाठी रवाना झाली. मंगळवारी सांयकाळच्या सुमारास शहरातील मोंढा परिसरात संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून संशयितांच्या कार समोर पाेलिस गाडी आडवी लावून संशयित आरोपींना बेड्या ठोकत मुलाची अपहरणकर्त्यांकडून सुटका केली.

दरम्यान पाेलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेऊ लागले आहे. पाेलिस दल आज (बुधवार) या संदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Exit Poll : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : शिवाजीनगरच्या आमदारपदी सिद्धार्थ शिरोळे? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT