Jalna Crime  Saam Tv
क्राईम

Crime: लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; राजकीय नेत्यावर बलात्काराचा गुन्हा

Jalna Crime: जालन्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका राजकीय नेत्याने महिलेवर बलात्कार केला. प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो दाखवत जीवे मारण्याची देखील धमकी दिली. या प्रकरणी नेत्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

लग्नाचे आमिष दाखवून राजकीय नेत्याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालनामध्ये घडली. प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा छळ केला. महिलेने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी प्रहारच्या जालना जिल्हाध्यक्षाविरोधात कारवाई केली. जालन्याच्या प्रहारचा जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे याच्यावर जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जालन्यातील प्रहारच्या जिल्हाध्यक्षाने बलात्कार केला. त्याचसोबत महिलेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची तसंच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महिलेने याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोहन मुंडेच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मोहन मुंडे हा जालना जिल्हा प्रहारचा जिल्हाध्यक्ष आहे.

मोहन मुंडेने पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवले. तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर त्याने महिलेसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला. आपल्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असं म्हणत मोहन मुंडेने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं महिलेने तक्रारी म्हटलं आहे. या प्रकरणी जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये मोहन मुंडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi- Hindi Row: मनसेचा भाजप आमदाराला दणका; कार्यालयावरील गुजराती पाटी हटवली|VIDEO

Ye Re Ye Re Paisa 3 : 'येरे येरे पैसा ३' फक्त ९९ रुपयांत पाहता येणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Sweating During Sleep: रात्री झोपताना घाम येतोय का? हे लपलेले आजार कारणीभूत असू शकतात

Mahadev Munde Case: वाल्मीक कराडनेच महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शिला संपवलं, जुना सहकारी बांगरचा खळबळजनक दावा

Suraj Chavan : विजय घाडगे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; सुरज चव्हाण यांना अटक होणार ? | VIDEO

SCROLL FOR NEXT