Mumbai Crime: इमारतीच्या 30व्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांना वेगळाच संशय

Bhandup Suicide Case: मुंबईतील भांडुप येथे एक धक्कादायक घटना घडलीय. एका अल्पवयीन मुलाने ३० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय.
crime news
crime newsSaam Tv
Published On

मुंबईतील भांडुपमधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलीय. एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून मुलीने आयुष्य संपवलंय. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केलाय. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र वेगळाच संशय व्यक्त करत मुलीने आत्महत्या केली नसल्याचा दावा केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी मित्राला भेटण्यासाठी आली होती अशी माहिती मिळत आहे. अल्पवयीन मुलीनं इमारतीच्या ३० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. परंतु तिच्या पालकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय. त्यामुळे या घटनेचा पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणी केली जात आहे.

crime news
Crime: हॉटेलमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आठवी-दहावीतील ४ विद्यार्थ्यांचं भयंकर कृत्य

साठ्ये कॉलेजमध्ये तरूणीनं आयुष्य संपवलं

२१ वर्षीय संध्या पाठक नावाच्या मुलाने साठ्ये कॉलेजमध्ये आत्महत्या केल्याची घटनाही काही दिवसापूर्वी घडली होती. ती साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत होती. संध्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र तिच्या पालकांनी मृत्यूबाबत वेगळाच संशय व्यक्त केलाय.

crime news
Crime: १९ वर्षीय तरुणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून फेकलं; तरुणाचं धक्कादायक कृत्य, बहिणीनं सगळं खरं खरं सांगितलं

हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

लातूरमध्ये एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. लातूरच्या विलासराव देशमुख कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात हा विद्यार्थी शिकत होता. हॉस्टेलमधील एका रुममध्ये गळफास लावून त्याने आत्महत्या केली होती. त्याच्या खोलीमध्ये नीट परीक्षेचे दोन मार्कशीट आढळून आले होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात असणाऱ्या होस्टेलमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केली. दीपक कुमार धनावत असे अमृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दीपक हा मूळचा राजस्थान येथील रहिवासी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com