Jalgaon Murder 14 Year Old Boy Saam Tv News
क्राईम

वडिलांनी मुलाला दुकानात बसण्यास सांगितलं, तिथून पोरगा गायब, झुडूपांमध्ये छिन्नविन्न अवस्थेत मृतदेह; जळगावात खळबळ

Jalgaon Murder 14 Year Old Boy : राजेश महाजन हा रिंगणगाव येथे आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीकाम करण्यासोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

Prashant Patil

जळगाव : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील रिंगणगाव येथे एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश गजानन महाजन (वय १४, रा. रिंगणगाव ता. एरंडोल) असं मृत बालकाचं नाव असून, नरबळीचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

राजेश महाजन हा रिंगणगाव येथे आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीकाम करण्यासोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काल सोमवारी गजानन महाजन जळगावला कामानिमित्त गेले होते. त्यांनी राजेशला दुकानावर बसण्यास सांगितलं होतं. राजेशने दुकान बंद करून घरी परत येईल असं कुटुंबाला वाटलं होतं, परंतु तो घरी आला नाही. सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस असल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली आणि एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

रात्रभर शोध, सकाळी मृतदेह आढळला

राजेश सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. संपूर्ण गावकऱ्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर आज सकाळी सहा वाजता गावाशेजारील काटेरी झुडपांमध्ये त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे जळगावसह त्याचं गाव रिंगणगाव हादरलं आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिकची टीमही घटनास्थळी पोहोचली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

नरबळीचा संशय आणि संशयित ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणी तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासानुसार, पोलिसांनी नरबळीच्या दिशेने तपास सुरू केला आहे. राजेश शाळेचा पहिला दिवस असूनही वडिलांसोबत जळगावला जाण्याऐवजी दुकानावर बसला होता. सायंकाळी दुकानात असताना त्याने बाजारातून बिर्याणी घेतली होती आणि त्यावेळी त्याच्याजवळ काही पैसेही होते, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर तो कुणाला दिसला नाही. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

SCROLL FOR NEXT