Crime News in Marathi Saamtv
क्राईम

Jalana Crime: ट्रॅक्टर चोरायचा, परराज्यात विकायचा, एक चुक केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; नेमकं काय घडलं?

Crime News in Marathi: तब्बल 16 गुन्हे दाखल असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करणारा अट्टल चोरट्याला पकडण्यास जालना पोलिसांना यश आले आहे. जालन्याच्या हसनाबाद पोलिसांच्या पोलिसांनी सापळा रचून ही मोठी कारवाई केली असून चोरीच्या ट्रॅक्टरसह त्याला ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalana Crime News:

तब्बल 16 गुन्हे दाखल असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करणारा अट्टल चोरट्याला पकडण्यास जालना पोलिसांना यश आले आहे. हा चोरटा संशय येऊ नाही म्हणून ट्रॅक्टरला काळा रंग करून इतर राज्यात विक्रीसाठी पाठवायचा. जालन्याच्या हसनाबाद पोलिसांच्या पोलिसांनी सापळा रचून ही मोठी कारवाई केली असून चोरीच्या ट्रॅक्टरसह त्याला ताब्यात घेतले आहे.

हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक काळ्या रंगाचा एक जण घेऊन जातं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास खादगाव पाटीपर्यंत पाठलाग करून संशयितास ताब्यात घेतले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केल्यानंतर त्याने हा ट्रॅक्टर अक्षय घाडगे (रा. बारसवाडा) व लक्ष्मण बाबुराव गाडे उर्फ नाना (रा. पाचोड) यांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील केंब्रीज परिसरातुन चोरी करुन आणल्याची कबुली दिली.

तसेच त्याला काळा रंग करुन सदरील ट्रॅक्टर हा बाहेर राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी या बाबद एम.आय.डी.सी सिडको पोलीस ठाणे या ठिकाणी चौकशी केली असता याचा गुन्हा नोंद असल्याचीही माहिती समोर आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीविरुद्ध 16 चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हे पुढील तपासासाठी पोलीस ठाणे एम.आय.डी.सी सिडको यांचे ताब्यात दिले असून ट्रॅक्टर चोरीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT