Akhilesh Yadav: सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अशी नोटीस का? सीबीआयच्या समन्सवर अखिलेश यादव यांनी उपस्थित केले प्रश्न

Akhilesh Yadav On CBI summons: उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सीबीआयने समन्स बजावून हजार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Akhilesh Yadav On CBI summons
Akhilesh Yadav On CBI summonsSaam Tv
Published On

Akhilesh Yadav On CBI summons:

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सीबीआयने समन्स बजावून हजार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीबीआयला दिलेल्या उत्तरात अखिलेश यादव यांनी समन्सच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अशी नोटीस का पाठवली जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी हे समन्स घाईत पाठवण्यात आल्याचेही अखिलेश म्हणाले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, अखिलेश यादव सीबीआयसमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. स्वतः हजर राहण्याऐवजी त्यांनी सीबीआयच्या समन्सवर उत्तर पाठवलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akhilesh Yadav On CBI summons
IRCTC Tour Packag: रामायणाशी संबंधित श्रीलंकेतील प्रमुख तीर्थक्षेत्रांना स्वस्तात देता येणार भेट, IRCTC ने आणला जबरदस्त टूर पॅकेज

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्यास अखिलेश यांची मंजुरी

अखिलेश यादव म्हणजे आहेत की, ते उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्याच्या लखनौ येथील निवासस्थानी त्याची चौकशी होऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, विरोधी पक्षनेता या नात्याने उत्तर प्रदेशच्या मतदारांप्रती त्यांचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे म्हटले आहे.  (Latest Marathi News)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहून सीबीआयच्या समन्सचे पालन करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. कायद्याचे पालन करणारा नागरिक म्हणून कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करण्यास तयार आणि इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

Akhilesh Yadav On CBI summons
Lok Sabha Election: भाजप कोणत्या राज्यातून किती जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक?

दरम्यान, सीबीआयने 21 फेब्रुवारी रोजी सीआरपीसीच्या कलम 160 अंतर्गत नोटीस जारी केली आणि अखिलेश यादव यांना गुरुवारी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 2012 ते 2016 दरम्यान हमीरपूरमधील बेकायदेशीर खाणकाम विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com