Jalgaon News : तर निवडणुकांवर बहिष्कार; मक्तेदार संघटनेचा इशारा, जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे

Jalgaon News : सरकारचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेत अनेक अडचणी निर्माण होत आहे.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांसह जिल्हा प्रशासन जलजीवन मिशन योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा (Jalgaon) आरोप करत मक्तेदार संघटनेकडून (Jalgaon ZP) जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तेदार संघटनेकडून देण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Jalgaon News
Yavatmal News : भीषण आगीत नऊ दुकाने जळून खाक; पुसदमध्ये मध्यरात्रीची घटना

सरकारचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेत अनेक अडचणी निर्माण होत आहे. पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जलजीवन मिशनचे कंत्राटदार व मक्तेदारांना योजनेच्या कामात अडचणी येत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील योजनेचे अनेक कामे बंद आहेत. दरम्यान या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मक्तेदार संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालयासमोर (Zilha Parishad) बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon News
Dhule News : कॅफेवर पोलिसांची धाड; अश्लील चाळे करणारे तरुण- तरुणी ताब्यात

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष 

दरम्यान पाणीपुरवठा मंत्री व जिल्हा प्रशासन हे जलजीवन मिशन योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मक्तेदार संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्यास आगामी निवडणुकांवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तेदार संघटनांच्या वतीने देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com