Yavatmal News : भीषण आगीत नऊ दुकाने जळून खाक; पुसदमध्ये मध्यरात्रीची घटना

Pusad News : परिसरात आग लागल्याचे समजताच नागरिकांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले.
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv

संजय राठोड

पुसद (यवतमाळ) : यवतमाळच्या पुसद शहराततील आंबेडकर चौकातील दुकानांना मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक आग लागली. या (Fire) आगीत नऊ दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत (Yavatmal) दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

Yavatmal News
Wardha Crime : बँकेत हातचलाखी करून फसवणूक करणारा ताब्यात; साडेचार हजार रुपये केले जप्त

पुसद (Pusad) शहरातील आंबेडकर चौकात असलेल्या दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागली. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. परिसरात आग लागल्याचे समजताच नागरिकांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. यानंतर अग्निशमन विभागाला (Fire Brigade) याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेतले. आग आटोक्यात येत नसल्याने जेसीबीद्वारे काही दुकानांचे शटर उघडण्यात आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yavatmal News
Jalna News : ठेवीदारांचा रास्ता रोको; ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी

आगीत प्रचंड नुकसान 

सदर आग ही शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानांना लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आगीत किती नुकसान झाले याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com