Crime News x
क्राईम

Crime : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं; क्राईम शो पाहून रचला हत्येचा कट

Crime News : एका महिलेने प्रियकराच्या साथीने तिच्या पतीची हत्या केली. आरोपींनी गळा चिरुन महिलेच्या पतीला संपवले. क्राईम शो पाहून आरोपींनी हत्येचा कट रचला होता.

Yash Shirke

  • पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • आरोपींनी क्राईम शो आणि वेबसीरीज पाहून खूनाचा कट रचला, तपासात माहिती उघड झाली.

  • मृत व्यक्ती ई-रिक्षा चालक मनोज रायगर असून, पत्नीचे अनैतिक संबंधातून पतीची हत्या करण्यात आली.

Shocking : एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली, त्यांनी गळा चिरुन पतीला संपवले. क्राईम शो आणि वेबसीरीज पाहिल्यानंतर आरोपींनी हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हत्येसाठी आरोपींना नवीन सिमकार्ड खरेदी केले होते. ही घटना राजस्थानच्या जयपूर येथे घडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी जयपूरमधील मुहाना पोलीस ठाण्यात सुमेरनगर फुटबॉल मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेह रक्ताने माखलेला होता. मृत व्यक्तीचे नाव मनोज कुमार रायगर असल्याचे म्हटले जात आहे. तो ई-रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असे.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मनोजच्या कुटुंबीयांना बोलवण्यात आले. त्याच्या भावाने, अशोकने सांगितले. मनोज १६ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास ई-रिक्षातून प्रवाशांसह निघाला होता. त्यानंतर आम्हाला रात्री साडेदहा वाजता सुमेर नगरला येण्याचा फोन आला. आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला कळले की कोणीतरी त्याच्या भावाचा गळा चिरून खून केला आहे.

घटनेस्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनोजव्यतिरिक्त ई-रिक्षामध्ये आणखी एक व्यक्ती बसल्याचे दिसले. तपासातून मनोजची पत्नी, तिचे मित्र ऋषी श्रीवास्तव आणि मोहित शर्मा यांनी ही हत्या केल्याचे समोर आले. मनोजच्या पत्नीचे ऋषी श्रीवास्तव या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. क्राईम मालिका आणि सीरीज पाहिल्यानंतर त्यांनी मनोजला मारण्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी प्रवासी बसून ई-रिक्षात निर्जन ठिकाणी नेली आणि मनोजचा गळा चिरुन त्याची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

विकासाच्या वेगात पर्यावरणाचा बळी? राज्यातील आणखी एका जिल्ह्यात १०० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड

Homemade Chat Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'चटपटीत' चाट मसाला, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

नितीश राणाची अंपायरसोबत तू-तू, मैं-मैं; संतापलेल्या स्टब्सनं तावातावात फेकलं हेल्मेट, सामन्यादरम्यान चेपॉकमध्ये काय घडलं?

Mumbai Local: पश्चिम रेल्वे खोळंबली! वसईजवळ ओव्हरहेड वायर तुटली; प्रवासी रूळावरून चालत निघाले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT