Shashank Rao : ठाकरे बंधूंचा मुंबईत पराभव, 'बेस्ट'वर झेंडा फडकवणारे शशांक राव कोण?

Who is Shashank Rao Need to Know All about : बेस्ट पतपेढी निवडणूकीमध्ये ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नाही. शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक १४ जागा जिंकल्या.
Who is Shashank Rao
Who is Shashank Raosaam tv
Published On
Summary
  • ठाकरे बंधूंना धक्का, बेस्ट पतपेढी निवडणुकीत मोठा पराभव

  • शशांक राव यांच्या पॅनलचा सर्वाधिक १४ जागांवर विजय

  • महायुतीच्या सहकार समृद्ध पॅनलला मिळाल्या ७ जागा

Shashank Rao Best : मराठीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रितपणे लढणार असल्याचे म्हटले जात होते. ठाकरे बंधूंची युतीची बेस्टच्या पतपेढी निवडणुकीने झाली. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू यांचे उत्कर्ष पॅनल होते.

मंगळवारी (१९ ऑगस्ट) मध्यरात्री बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुकीमध्ये महायुती सरकारचे सहकार समृद्ध पॅनल आणि ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल यांच्यामध्ये लढत होईल असे सर्वांना वाटत होते. पण दोघांना पछाडत शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या पॅनलला ७ जागा मिळाल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकाही जागी यश मिळाले नाही.

Who is Shashank Rao
Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

ठाकरे बंधूंचा बेस्ट पतपेढी निवडणूक ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीची लिटमस टेस्ट होती असे मानले जात होते. २० वर्षांनी दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्याने या निवडणुकीत ते बाजी मारणार असे म्हटले जात होते. पण आश्चर्याचा धक्का देत शशांक राव यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला. एका बाजूला ठाकरेंना धक्का देत त्यांनी बलाढ्य महायुतीलाही मागे टाकले.

Who is Shashank Rao
Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

कोण आहेत शशांक राव? (Who is Shashank Rao?)

मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव हे प्रमुख आहेत. कामगार संघटनेचे नेते शरद राव हे शशांक राव यांचे वडील आहेत. शशांक राव यांनी काही वर्षांपूर्वी कामगार संघटनांमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणामध्येच त्यांनी मोठ्या ऑटोरिक्षा युनियनच्या संपाचे नेतृत्त्व केले होते, त्यांनी संप यशस्वी केला होता. लोकसभा निवडणुकांपूर्वी शशांक राव यांनी जनता दल युनाईटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी मे २०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Who is Shashank Rao
Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

मागील अनेक वर्षांपासून शशांक राव हे कामगार संघटनांबरोबर सक्रिय आहेत. बऱ्याचशा कामगार आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेत महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. कामगारांसाठी काम करण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे, त्याच्याकडे नेतृत्त्वकौशल्यदेखील आहे. कामगारांच्या अनेक आंदोलनात त्यांनी भूमिका बजावली आहे. खासकरुन बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे.

Who is Shashank Rao
माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com