माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Fact Check : राहुल गांधींनी व्होटचोरीचा आरोप केल्यानंतर माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच राजीव कुमार देश सोडून पळून गेलेयत का...? काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य...? पाहुयात..
former chief election commissioner rajiv kumar
former chief election commissioner rajiv kumar x
Published On

माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देश सोडून माल्टामध्ये गेल्याचा दावा करण्यात आलाय...लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वोटचोरी केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावर करण्यात आलाय...त्यामुळे ते भारत सोडून माल्टा देशात पळाल्याचा दावा केलाय...त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे...पण, खरंच राजीव कुमार हे देश सोडून पळालेयत का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज - राहुल गांधींनी व्होट चोरीचे आरोप केल्याने माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून माल्टामध्ये स्थायिक झालेत. राजीव कुमार यांनी माल्टा देशाचं नागरिकत्व घेतलंय.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी देशात लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्होटचोरी केल्याचा आरोप केला होता...त्यामुळे देशभरात सध्या वातावरण चांगलंच तापलंय...अनेक ठिकाणी मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचेही साम टीव्हीने उघडकीस आणलं...मात्र, राहुल गांधींच्या आरोपानंतर माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पळून गेलेयत का...? हा प्रश्न बरेचजण विचारत आहेत...त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती आम्ही मिळवली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

former chief election commissioner rajiv kumar
Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

  • मुख्य निवडणूक आयुक्त भारतातच आहेत

  • राजीव कुमार माल्टा देशात पळून गेलेले नाहीत

  • माल्टा देशाचं नागरिकत्व घेतल्याचा दावा खोटा

  • राहुल गांधींच्या आरोपानंतर राजीव कुमार पळालेले नाहीत

former chief election commissioner rajiv kumar
Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

सध्या देशभरात व्होट चोरीचा मुद्दा गाजत असल्याने राजीव कुमार पळून गेल्याचा दावा करण्यात आला...मात्र, आमच्या पडताळणीत राहुल गांधींच्या व्होट चोरीच्या आरोपानंतर राजीव कुमार पळाले हा दावा असत्य ठरलाय...

former chief election commissioner rajiv kumar
Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com