Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Pune News : पुण्यातील एका शाळेच्या प्रांगणामध्ये लावणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाळेमध्ये लावणीचा कार्यक्रम झाल्याने टीका व्हायला सुरुवात झाली. यावर शाळेने स्पष्टीकरण दिले आहे.
Pune Viral Video
Pune Viral Videox
Published On
Summary
  • पुण्यातील मोरगाव येथे विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या यात्रेतील मनोरंजन कार्यक्रमाचा लावणीचा व्हिडीओ व्हायरल.

  • तीन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ असून ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त कार्यक्रम झाला होता.

  • शाळा बंद असताना यात्रा समितीने आयोजन केले; विद्यालय व शिक्षकांचा कुठलाही सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण.

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Viral Video : पुण्यातील मोरगाव येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी अंगविक्षेप करत लावणी सादर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एका विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ तीन महिन्यांपूर्वीचा आहे. हा व्हिडीओ बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाचा आहे. या व्हिडीओवरुन टीका व्हायला सुरुवात झाल्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Pune Viral Video
Priya Berde : चिमटे काढले, गाल ओढले; कमरेत हात घालून... लक्ष्याच्या बायकोकडून गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

गावपरंपरेनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेतले जातात, त्या मनोरंजन कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. यात विद्यालय आणि शैक्षणिक संस्थेचा कसलाही सहभाग नसल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी म्हटले आहे.

Pune Viral Video
१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोरगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी यांच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ६ ते ८ मे २०२५ यादरम्यान रोजी विद्यालयाच्या प्रांगणात केले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने विद्यालय बंद होते. त्यामुळे यात्रा कमिटी ग्रामस्थ मोरगाव यांच्या विनंती आणि मागणीवरून तोंडी परवानगी दिली गेली होती. या उत्सवात विद्यालय आणि विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी कसलाही सहभाग घेतला नव्हता असे स्पष्टीकरण विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Pune Viral Video
Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com