Shooting Coach Mohsin Khan Accused in Virginity Test Case Saam Tv News
क्राईम

Shooting Coach : खोलीच्या काळोखात १२ पीर बाबा, म्हणाले तुजी व्हर्जिनिटी चेक करावी लागेल; शूटिंग कोचने तरुणीसोबत काय केलं?

Shooting Coach Mohsin Khan Accused in Virginity Test Case : इंदूरमध्ये नेमबाजी प्रशिक्षक मोहसीन खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित तरुणीनं त्याने तिच्यासोबत काय केलं त्याची आपबीती सांगितली आहे.

Prashant Patil

इंदूर : इंदूरमध्ये नेमबाजी प्रशिक्षक मोहसीन खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित तरुणीनं त्याने तिच्यासोबत काय केलं त्याची आपबीती सांगितली आहे. ती म्हणाली की, 'तिथे खूप अंधार होता. तो मला एका खोलीत घेऊन गेला. जेव्हा दार उघडले तेव्हा आत १२ पीर बाबा बसले होते. तो मला सांगू लागला की मला माझी व्हर्जिनिटी चेक करावी लागेल'. ज्या मुलीच्या तक्रारीवरून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नेमबाजी प्रशिक्षक मोहसीन खानविरुद्ध सातवा एफआयआर दाखल करण्यात आला होता, तिने हे उघड केलं आहे.

अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात मोहसीन खानविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीनविरुद्ध आता एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. यावेळी मोहसीनविरुद्ध खटला दाखल करणाऱ्या मुलीने केलेले आरोप खूपच गंभीर आणि धक्कादायक आहेत. मुलीच्या म्हणण्यानुसार, मोहसीनने शूटिंग रेंज उघडण्याच्या आणि तिला बंदूक देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले. मग, पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली, त्याने एका महिलेकडून आणि डझनभर पीर बाबांकडून तांत्रिक विधी करून घेतले. त्याने एका तरुणावर तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि नकार दिल्यावर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती नोकरीच्या जाहिरातीद्वारे ड्रीम ऑलिंपिकमध्ये गेली होती. कामाचे कौतुक करताना मोहसीन म्हणाला की, तुम्ही नेमबाजी शिकली पाहिजे. त्याने मला शूटिंग रेंज उघडण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात लाखो रुपये घेतले. रेंज उघडण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता असेल असे सांगितले. मोहसीनने त्याची ओळख साधवा जोहरी नावाच्या व्यक्तीशी करून दिली आणि म्हणाला, देवदूतला खूश करण्यासाठी तुला बुधवारी वधूसारखे कपडे घालून यावे लागेल. जर देवदूत दयाळू असेल तर तो तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडेल. साधवाने असा एक व्हिडिओ दाखवला होता ज्यामध्ये बेडवर खूप साऱ्या नोटा पडलेल्या होत्या. मोहसीन मला हवा बंगला येथील फार्म हाऊसवर घेऊन गेला.

पीडितेने सांगितले की, परफ्यूम लावल्यानंतर साधवाने सांगितले की, व्हर्जिनिटी चेक करावी लागेल. मी खोलीत गेली तेव्हा तिथे १० ते १२ पीर बाबा होते. त्यापैकी एकाने धूप पेटवले आणि म्हणाला, लक्ष केंद्रित करा, तो देवदूत दयाळू होणार आहे. जेव्हा मी लक्ष केंद्रित करू शकले नाही, तेव्हा पीर बाबांनी मोहसीन आणि साधना जोहरी यांना सांगितलं की ही मुलगी आपल्या कामाची नाही. जिनी रागावेल आणि आपण उद्ध्वस्त होऊ.

तरुणीने पुढे सांगितलं, तंत्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मोहसिनने मला सांगितलं की, या कामात माझे २० लाख रुपये वाया गेले. तुझ्यामुळे पैशांचा पाऊस पडला नाही. त्याने मला फैजान खानशी ओळख करून दिली आणि सांगितलं, जे झालं ते विसर आणि शूटिंग अकादमी उघडण्यासाठी पुढे तयारी कर. मोहसिन म्हणाला की, फैजानशी संबंध ठेव. मी नोकरी सोडून थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा विचार केला होता, पण मोहसिनच्या लोकांनी मला धमकावलं. पण जेव्हा मोहसिनचे कारनामे उघड झाले आणि मला त्याची माहिती मिळाली, तेव्हा मी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT