Raja Raghuvanshi Sonam Bewafa  Saam Tv News
क्राईम

Raja Raghuvanshi Postmortem Report : राजा रघुवंशी केसमध्ये मोठी अपडेट, पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, शरीरावर जखमांच्या खुणांसह धक्कादायक खुलासे

Raja Raghuvanshi Sonam Bewafa : इंदूरच्या राजा रघुवंशी यांच्यावर दोनदा हल्ला झाला. एकदा त्यांच्या पाठीवर आणि एकदा त्यांच्या डोक्यावर. या हल्ल्यात राजा यांचा मृत्यू झाला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात हे उघड झालं आहे.

Prashant Patil

इंदूर : इंदूरच्या राजा रघुवंशी यांच्यावर दोनदा हल्ला झाला. एकदा त्यांच्या पाठीवर आणि एकदा त्यांच्या डोक्यावर. या हल्ल्यात राजा यांचा मृत्यू झाला. एका प्रसार माध्यमांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात हे उघड झालं आहे. राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशी सध्या गाजीपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.

इंदूरहून मेघालयात हनिमूनसाठी आलेल्या जोडप्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडल्यानंतर एका आठवड्यानंतर, मेघालय पोलिसांनी त्यांची पत्नी सोनमला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. सोनमने उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे.

राजा आणि सोनम २२ मे रोजी मेघालयातील मावलाखियात गावात पोहोचले. त्यांनी एक स्कूटर भाड्याने घेतली आणि नंतर नोंगरियात गावाला भेट देण्यासाठी गेले, जिथे ते 'लिव्हिंग रूट ब्रिज' पाहण्यासाठी सुमारे ३००० पायऱ्या उतरून गेले. दोघांनी २२ मे रोजी रात्री गावातील एका होमस्टेमध्ये घालवली आणि २३ मे रोजी सकाळी तेथून निघून गेले. यानंतर, दोघेही बेपत्ता झाले.

राजाचा मृतदेह २ जून रोजी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात सापडला. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेह सापडला. २४ मे रोजी शिलाँग आणि सोहरा दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या एका कॅफेजवळ स्कूटर सोडून देण्यात आली होती. या घटनेनंतर , पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सोनमचा शोध सुरू केला, परंतु ३० मे रोजी मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे बचाव कार्य थांबवावे लागले. राजाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट ईशान्य इंदिरा गांधी रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस येथे तयार करण्यात आला.

सोनमच्या आत्मसमर्पणानंतर मेघालय पोलिस महासंचालक आय. नोंगरांग म्हणाले की , सोनम व्यतिरिक्त आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले, "सोनमने तिच्या पतीला मारण्यासाठी मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. पोलीस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत." लवकरच हत्येचा संपूर्ण कट आणि त्यात सहभागी असलेले सर्व चेहरे उघड होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT