Crime News x
क्राईम

Crime : छातीला स्पर्श करायचा, नको त्या जागी हात...; महिला सहकाऱ्यांची तक्रार, नराधम डॉक्टरला अटक

Crime News : महिला सहकाऱ्यांशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या हार्ट सर्जन डॉक्टरला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • महिला सहकाऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला ६ वर्षांची शिक्षा.

  • रुग्णालयात वारंवार अश्लील वर्तन उघड.

  • नोकरी गमावून आता पार्सल डिलिव्हरीचे काम.

Shocking : रुग्णालयात महिला सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या डॉक्टरला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना यूकेच्या लँकेस्टरमधील ब्लॅकपूल रुग्णालयात घडली. अटक होत असताना डॉक्टरने लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळत 'मी फक्त फ्लर्टिंग करत होतो' असे म्हटले.

२०१६ ते २०२२ या दरम्यान हे भारतीय वंशाचे डॉक्टर जेव्हा रुग्णालयातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख होते तेव्हा या घटना घडल्या. न्यायालयामध्ये एका महिलेने सांगितले की, डॉक्टरांचे असे वर्तन सर्वांना परिचयाचे झाले होते. नवीन येणाऱ्यांना त्यांच्या अशा वागणुकीबाबत आधीच सावध केले जात आहे. या डॉक्टरने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर महिलांच्या शरीराबाबत अक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

एका पीडितेने न्यायालयाला जबाब देताना डॉक्टरवर अनेक आरोप केले. शस्त्रक्रियेपूर्वी तयारी करत असताना आरोपी डॉक्टरने मला नको त्या ठिकाणी स्पर्श केला होता. ऑपरेशन थिएटरमध्ये मदत करत असताना त्याने हातमोजे घातलेले असताना जाणूनबुजून माझ्या छातीला स्पर्श केला. दुसऱ्या एका महिलेने न्यायालयाला सांगितले की, डॉक्टरने वरच्या खिशातून पेन काढत असताना माझ्या स्तनाला स्पर्श केला होता. डॉक्टर प्रत्येक भेटीदरम्यान अयोग्यरित्या स्पर्श करत असत. त्यामुळे आम्ही घाबरु लागलो होतो. डॉक्टरपासून दूर राहण्यासाठी आम्ही आमच्या कामाच्या वेळा बदलून घेत होतो, असे रुग्णालयात काम करणाऱ्या महिलांनी सांगितले.

महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या भारतीय वंशाच्या डॉक्टरला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. 'डॉक्टर हा अंत्यत कुशल सर्जन आहेत. पण त्यांचे वर्तन एका डॉक्टरला शोभण्यासारखे नाही', असे न्यायालयाने म्हटले. तक्रारींमुळे त्यांनी नोकरी गमावली असून सध्या ते पार्सल डिलिव्हरीचे काम करत आहेत, असे डॉक्टरच्या वकिलाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT