ima members demands to arrest dr suraj rupnar in rucha rupnar case sangola Saam Tv
क्राईम

डाॅक्टरच्या अटकेसाठी आयएमए संघटना सरसावली, पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन; नेमकं काय घडलं सांगाेल्यात?

ima members demands to arrest dr suraj rupnar in rucha rupnar case sangola: अटक करा...अटक करा..डाॅ. सूरज रुपनरला अटक करा... अशा घाेषणा देत आय़एमए सदस्यांनी सांगाेला पाेलिस ठाण्यात आंदाेलन छेडले.

भारत नागणे

डाॅ. ऋचा रूपनर यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या त्यांचे पती डाॅ. सूरज रूपनर यास अटक करा या मागणीसाठी सांगोला आणि पंढरपूर येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या (आयएमए) सदस्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पाेलिसांनी डाॅ. सूरज रुपनर याचा शाेध सुरु असल्याचे आंदाेलकांना स्पष्ट केले.

सांगोला येथील डाॅ. ऋचा रूपनर यांनी पती डाॅ. सुरज रूपनर याच्या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून 6 जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेच्या तीन दिवसांनंतर सांगोला पोलिसांनी पती डाॅ. सुरज रूपनर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

डाॅ. सूरज रूपनर याचा पाेलिस शाेध घेताहेत. दरम्यान डाॅ.सूरज रुपनरला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सदस्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आयएमए सदस्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पाेलिसांनी आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिल्या नंतर आयएमए सदस्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

Maharashtra Live News Update: मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला

Morning Yoga Poses: दररोज सकाळी फक्त १५ मिनिटे करा योगा, संपूर्ण दिवसभर राहाल फ्रेश

SCROLL FOR NEXT