Sangola News: सांगोल्याचा पुन्हा मीच आमदार होणार, शहाजी पाटील यांचा दावा

Shahajibapu Patil News: सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. सूतगिरणीच्या सर्व 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSaam Tv
Published On

Sangola News:

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. सूतगिरणीच्या सर्व 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. सांगोल्यात शेकाप आणि आमदार पाटील गट हे पारंपरिक विरोधक आहेत.

विधानसभे पूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाईट वॉश दिला आहे. महिला सूतगिरणी निवडणुकीत शेकापच्या सर्व २१ जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणूकीच्या निकाला नंतर शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत बाबासाहेब देशमुख यांची मिरवणूक काढली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा करुन शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shahajibapu Patil
BJP Lok Sabha Election Plan: लोकसभेसाठी भाजपची नवीन रणनीती! 70 वर्षांवरील नेत्यांना डच्चू, तरुणांना संधी? नेमका काय आहे प्लान? जाणून घ्या

पंढरपूर - सांगोल्याचा पुन्हा मीच आमदार; शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचा मोठा दावा

''मी आमदार आहेच, पुढे पण मीच आमदार राहणार, पण माझा सोबत दीपक साळुंखे हे देखील आमदार होतील'', असे विधानसांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी आज सांगोल्यात केले. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात आमदार पाटील यांनी हे विधान केले आहे. मात्र पुन्हा आमदार होणार असं म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांचा सूतगिरणी निवडणुकीत शहाजी बापू पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सुपडा साफ केला. (Latest Marathi News)

ही निवडणूक जिकल्यानंतर बाबासाहेब देशमुख म्हणाले आहेत की, सांगोला तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो, हे मी सांगण्याची गरज नाही. राजकारणामध्ये सातत्याने निवडणुका होत जातात. निवडणुकीमध्ये कोणालाही छोटं किंवा कमी समजणं हे चुकीचं आहे, परंतु आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोला मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार शंभर टक्के लाल बावटा फडकवल्या शिवाय राहणार नाही विश्वास ही त्यांनी व्यक्त केली आहे.‌  

Shahajibapu Patil
Shinde VS Pawar: अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? नेमकं कारण काय?

कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख?

बाबासाहेब देशमुख हे कै. गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय झाले. डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे उच्च शिक्षित असून गेल्या पाच वर्षांपासून सांगोल्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महिला सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत प्रथमच प्रचंड यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com