हैदराबादमध्ये आयटी कॉरिडॉरध्ये गेल्या २ वर्षात तब्बल २० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी आंध्र प्रदेशमधील २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
बी अभिलाष असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने २०२२ पासून मियापूर, चंदननगर, गचीबोवली आणि केपीएचबी कॉलनी भागात २० घरात चोरी केली होती. याबाबत आरोपीने स्वतः कबूली दिली आहे. चोरी करण्यासाठी आरोपी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून अपार्टमेंटमध्ये जायचा आणि सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी करायचा. (Latest News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून २६ तोळे सोने, ३०० ग्रॅम चांदी आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. या सर्व गोष्टी १६ लाखांच्या आहेत.
अभिलाष दरवाजा उघडण्यासाठी बोल्ट कटरचा वापर करत. तो फक्त काही निवडक अपार्टमेंटमध्ये चोरी करायचा. डिलिव्हरी एक्झिक्युटीव्ह म्हणून अपार्टमेंटमध्ये प्रवेश मिळवायचा. त्यानंतर चोरी करायचा. आणि फोडलेले कुलूप घेऊन पसार व्हायचा. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्यानंतर मियापूर पोलिसांनी अभिलाषला मियापूर येथील आरटीसी कॉलनी येथे अटक केली.
अभिलाष हा मूळचा श्रीकाकुलम जिल्ह्यातील विक्रमपुरम गावातील रहिवासी आहे. अभिलाषने त्याचे मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले. काही वर्षांपूर्वी तो हैदराबादला शिफ्ट झाला. त्याने अनेक ठिकाणी नोकरी केली. परंतु खर्च काही भागत नव्हता.त्यामुळे त्याने चोरी करायला सुरुवात केली.
गेल्या दहा दिवसात चंदननगर, मियापूर आणि गचबौली भागात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. ज्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी अभिलाषला अटक करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.