Crime News Saam Tv
क्राईम

Crime : विवाहितेशी संबंध, ५ जणांकडून दोघांची हत्या, जंगलात रॉडने हल्ला करत घेतला जीव

Yavatmal double murder case : यवतमाळ जिल्ह्यात प्रेमसंबंधामुळे सख्ख्या नातेवाईकांकडून एका विवाहित महिला आणि प्रियकराची जंगलात हत्या. आरोपींमध्ये भाऊ, मामा, जावई यांचा समावेश.

Namdeo Kumbhar

Love affair leads to murder in Maharashtra : प्रेमसंबंधामुळे समाजात बदनामी होईल या भीतीपोटी सख्खा भाऊ, जावई, मामा तसेच इतरांनी विठाळा परिसरात आकाश बल्लाळ आणि वर्षा गिरे या दोघांचा खून केला. त्यानंतर यवतमाळच्या दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईसापूर परिसरात दोघांचेही मृतदेह फेकून दिले. या दुहेरी हत्याकांडात चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली.

यवतमाळच्या दिग्रस फेट्री साकरी जंगल परिसरात 7 एप्रिल रोजी कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळले. या प्रकरणात शवचिकित्सा अहवाल सुस्पष्ट नसतानाही पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतकाची ओळख पटली. विवाहितेशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून सख्खा भाऊ, चुलत भाऊ, जावई आणि मामा या चौघांनी संगणमत करीत दोघांची हत्या केल्याचे उघड झाले.

एलसीबी पथक, दिग्रस पोलीस, सायबर टीम यांनी मृतकाची ओळख पटवून चार आरोपींना अटक केली. वर्षा धनराज गिरे आणि आकाश विलास बल्लाळ या दोघांचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. 28 मार्च रोजी वर्षा ही पती व तिच्या मुलांना सोडून प्रियकर आकाश याला घेऊन वाशिममधून पुण्याला पळून गेली. या दरम्यान आकाशचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, जावई विजय भारत शिखरे आणि मामा विशाल शिखरे यांनी पुणे येथून त्या दोघांना परत आणले.

३ एप्रिल रोजी त्यांना पुसदमध्ये लॉजवर ठेवले. त्यानंतर विकास बल्लाळ विजय शिकारी विशाल शिकारी या तिघांनी कुणालचा कट रचला. विजय शिखरे याने त्याचे मित्र राजेश गोदमले व धर्मराज बोडखे यांना 4 एप्रिल रोजी बोलावून घेतले. रात्री साडेअकरा वाजता विठाळा जंगलात वर्षा व आकाशाचा खून केला. नंतर दोन्ही मृतदेह विजय शिकारे याने मालवाहू वाहनात टाकून दिग्रस शहरालगत असलेल्या फेट्री साकरी शिवारातील जंगलात फेकून दिले. मृतकाच्या दोन बॅग, ओळखपत्र, पैसे, मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काळीदौलत मार्गावरील पुलाजवळ जाळून टाकले, त्यानंतर आरोपी पसार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT