Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: होळीच्या दिवशी रक्तरंजित थरार, कुऱ्हाडीने ६ जणांवर सपासप वार; ३ महिलांसह एकाचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये होळीच्या दिवशी भयंकर हत्याकांडाची घटना घडली. एकाच कुटुंबातील ६ जणांवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात ३ महिलांसह एकाचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • होळीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये रक्तरंजित हत्याकांड

  • कुऱ्हाडीने हल्ला करून चौघांची हत्या

  • या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी

  • कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय

होळीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील बसंतपूर उदल गावामध्ये सहा जणांवर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. भावांमध्ये वाद झाला त्या वादानंतर हत्याकांडाची ही घटना घडली. ज्या व्यक्तींवर हल्ला करण्यात आला त्यांच्या कुटुंबातील एक लहान मुलगाच सुखरूप बचावला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी त्याला सोबत नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली. मध्यरात्री कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कुऱ्हाडीने सर्वांवर वार करण्यात आले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घरातून अचानक ओरडण्याचा आवाज आला. लोकांना काय घडत आहे हे समजले तोपर्यंत अंगण रक्ताने माखले होते. घरात सगळीकडे रक्ताचे पाट वाहत होते. शीतला (८२ वर्षे), संजू देवी (६० वर्षे), पार्वती (२० वर्षे) आणि बदलूराम (६२ वर्षे) या चौघांची हत्या करण्यात आली. घरातील अंगणामध्ये एका बाजूला नवरा-बायको आणि दुसऱ्या बाजूला आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

या हल्ल्यात जास्त रक्तस्राव झाल्यामुळो चौघांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात गुरुदेव (४० वर्षे) आणि निरंकर (३० वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निरंजनची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. कौटुंबिक आणि मालमत्तेच्या संदर्भातील वादातून ही घटना घडली. आरोपी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.

फॉरेन्सिक टीमने घराच्या आत आणि बाहेरून अनेक पुरावे गोळा केले. या हत्याकांडात वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली. घरात सामान विखुरलेले होते आणि सर्वत्र रक्ताचे डाग पडले होते. ग्रामस्थांनी सांगितले की, आरोपी काही काळापासून मानसिक तणावाखाली होता आणि घरात वारंवार वाद होत होते. परंतु हा वाद इतक्या मोठ्या हत्याकांडात रूपांतरित होईल याची कुणीही कल्पना करू शकत नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT