Crime News: सैतान काका! १३ महिन्यांच्या पुतणीचा गळा आवळला; सात तुकडे करत मृतदेह शेतात पुरला

Dharashiv Crime : तुळजापूर तालुक्यात एका १३ महिन्यांच्या मुलीची तिच्या काकाने गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध घेतल्यानंतर आणि शेतातून तिचा मृतदेह सापडल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
Dharashiv Crime :
Police officials investigate at Gavlewadi village in Tuljapur taluka after the arrest of the accused in the toddler murder case.Saam tv
Published On
Summary
  • १३ महिन्यांच्या बालिकेची धाराशिवमध्ये हत्या.

  • आरोपी सख्खा चुलता असून पोलिसांनी अटक केली.

  • बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

अवघ्या १३ महिन्यांच्या निष्पाप बालिकेची तिच्याच सख्ख्या चुलत्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर रागाच्या भरात शरीराचे सात तुकडे करून ते शेतात पुरले. अंगाचा थरकाप उडवणारी घटना धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी शिवारात घडली आहे. दरम्यान तामलवाडी पोलिसांनी नराधम चुलत्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Dharashiv Crime :
Shocking : "...तो तुझा मामा आहे" शेजारच्या तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं; मुलीला मांडीवर बसवलं अन्...

गवळेवाडी येथील महादेव माने यांची १३ महिन्यांची मुलगी आराध्या ही २७ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक बेपत्ता झाली होती. २८ फेब्रुवारी रोजी वडील महादेव माने यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर म्हणाले की, मुलगी बेपत्ता झाली, त्या दिवशी तिचा काका शंकेश माने हा तिला घेऊन जाताना दिसला होता अशी माहती गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती.

Dharashiv Crime :
Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

त्या माहितीवरून पोलिसांनी शंकेश माने याला ताब्यात घेतलं. त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "आराध्याची आई एका परपुरुषासोबत पळून गेली. ही मुलगी माझ्या भावाच्या रक्ताची नाही," असा संशय त्याच्या मनात होता. याच रागातून त्याने २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० ते ५.०० च्या दरम्यान आराध्याला शेतात नेलं.

तिथे आधी तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुराव्याचा नायनाट करण्यासाठी रागाच्या भरात शरीराचे सात तुकडे केले. हे तुकडे एका पोत्यात भरून त्याने शेतात पुरून टाकले. शनिवारी रात्री आरोपीने गुन्हा कबूल केल्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजता तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचांसमक्ष पुरलेले प्रेत बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com