Nashik Crime Saam Tv News
क्राईम

Nashik Crime: नाशिक हादरले! सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

Heartbreaking Crime in Nashik: नाशिकमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकाने आधी पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत: देखील टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

'मला तिचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे....', असे म्हणत एका वयोवृद्ध पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर या व्यक्तीने स्वत: देखील आत्महत्या केली. नाशिकच्या जेलरोड भागात ही घटना घडली. एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या ७६ वर्षांच्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. लता मुरलीधर जोशी (७६ वर्षे) आणि मुरलीधर रामचंद्र जोशी (८० वर्षे)) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात होते. त्यांची दोन मुले हे त्यांच्या कुटुंबासह मुंबई शहरात राहतात. अधून मधून दोघेही मुले आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिकला आई-वडिलांसोबत राहण्यासाठी यायचे किंवा आई बाबाला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन जायचे. मात्र लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला मोलकरणी ठेवली होती. ती महिला २४ तास जोशी दाम्पत्यांसोबत त्यांचेच घरात राहत होती.

काल सायंकाळी मोलकरीण घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांची आजारी पत्नीची हत्या करून स्वत: देखील टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी 'मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिची आजारपणातून सुटका करत आहे...’ असे लिहून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी स्वत:ही गळफास घेतला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जेव्हा मोलकरीण जोशी यांच्या घरी परत आली आणि तिने दरवाजा उघडला तेव्हा मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तर त्यांच्या पत्नी लता जोशी मृतावस्थेत आढळून आल्या. मोलकरणीने तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT