
उत्तर प्रदेशच्या मेरठ आणि बिजनोरमध्ये बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुजरातमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. नवरा घरातून बाहेर पडताच महिलेने आपल्या बॉयफ्रेंडला त्याचे लोकेशन पाठवले. त्यानंतर रस्ते अपघात घडवून आणत रवीला (३० वर्षे) संपवण्यात आले. रवीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याची पत्नी रिंकल आणि तिचा प्रियकर अक्षय डांगरिया यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ एप्रिल रोजी घडली जेव्हा रवी त्याच्या बाईकवरून कलावडहून जामनगरला परतत होता. रवीच्या बायकोने आणि तिच्या प्रियकराने त्याच्या हत्येची योजना आखली होती. रिंकलने रवीचे लोकेशन अक्षयसोबत शेअर केले. त्यानंतर अक्षयने आपल्या कारने रवीचा पाठलाग केला. विजरखी धरणाजवळ अक्षयने जाणूनबुजून रवीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला.
तपासात असे दिसून आले की, रिंकल आणि अक्षय यांचे एका वर्षाहून अधिक काळ अनैतिक संबंध होते. ज्यामुळे रवी आणि रिंकल यांच्यामध्ये सतत वाद होत होते. रवी आणि रिंकल यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगाही होता. रिंकलच्या अफेअरमुळे रवी तिच्यासोबत सतत वाद करत होता. याच रागातून तिने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. पोलिस तपासून असे आढळून आले की, अक्षयने आधीच आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता आणि रिंकल देखील रवीला घटस्फोट देण्याचा विचार करत होती परंतू तिला घटस्फोट घेण्यास अडचणी येत होत्या.
सुरुवातीला रवीचा अपघाती मृत्यू झाल्याचे सर्वांना वाटत होते. पण रवीच्या कुटुंबाला संशय आला. त्याचे काका परेश मकाना यांना या प्रकरणात काही विसंगती आढळल्या. रिंकलची चौकशी केली असतातिने कट रचल्याची कबुली दिली. जामनगरचे उपअधीक्षक आर.बी. देवधरा म्हणाले, 'आम्ही या प्रकरणाचा तपास अपघात म्हणून करत होतो पण रिंकल आणि डांगरिया यांच्यातील संबंधांची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले.' रवीच्या वडिलांनीही याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये रिंकलने कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी आता रिंकल आणि अक्षय यांना ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.