Pune Crime: पुण्यात सैराट! बहिणीशी पळून जाऊन लग्न, संतापलेल्या तरुणाने भावोजीचा काटा काढला; कोयत्याने सपासप वार

Man Brutally Assaulted for Eloping with Lover’s Sister: मावळमध्ये बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात ठेवून भावाने आपल्या भावोजीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Pune Crime
Pune CrimeSaam Tv
Published On

दिलीप कांबळे, मावळ

'सैराट' चित्रपटात जसं पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला होतो. तशीच घटना पुण्यातल्या मावळमघील सांगवी येथे घडली. बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी एका तरुणावर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना ५ एप्रिलला सांगवी गावच्या हद्दीतील वडगाव- मावळ- सांगवी रस्त्यालगत असलेल्या अनुष्का हॉटेलजवळ घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संकेत तोडकर असे कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शिवराज बंडू जाधव, यश अजय जाधव, आणि विशाल पाथरवट अशी आरोपींची नावे आहे. यातील यश जाधव आणि विशाल पाथरवट यांना वडगाव पोलिसांनी सापळा रचत अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने या दोघांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणातील शिवराज जाधव हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संकेत तोडकर यांनी शिवराज जाधवच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग शिवराजच्या मनात होता. त्यामुळे त्याने षडयंत्र रचत भावजीवर हल्ला केला. संकेत तोडकर हे त्यांच्या चुलत भावासोबत स्कूटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत होते. त्याचवेळी आरोपी शिवराज जाधवने यश जाधव आणि विशाल पाथरवट यांच्यासोबत संकेत तोडकर याने बाईकच्या सहाय्याने संतोष तोडकर यांच्या बाइकला धडक दिली.

शिवराज जाधवने बाइकद्वारे धडक दिल्यामुळे संकेत तोडकर आणि त्याच्या चुलत भाऊ खाली पडले. त्यानंतर शिवराज आणि यश यांनी सोबत आणलेल्या कोयत्याने संकेत यांच्यावर उजव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर, अंगठ्यावर आणि डाव्या खांद्यावर वार केले. तर विशाल पाथरवटने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर जोरदार मारहाण केली.

या हल्ल्यात संकेत तोडकर गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अति दक्षता विभागात उपचार घेत आहेत. सैराट चित्रपटातील कथानक जणू प्रत्यक्षात साकारल्यासारखी ही घटना असून प्रेम विवाह केल्यामुळे एखाद्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आजही येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com