Gujrat Rajkot Crime News:  Saamtv
क्राईम

Crime News: 'सॉरी आई, मी तुला मारलं', पोटच्या लेकानेच जन्मदातीला संपवलं, नंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली; मन हेलावणारी घटना!

Gujrat Rajkot Crime News: गुजरातच्या राजकोटमध्ये पोटच्या लेकरानेच आपल्या आईला संपवल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे नंतर त्याने सॉरी आई मी तुला मारलं, असा स्टेटसही ठेवला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

गुजरात, ता. ३१ ऑगस्ट २०२४

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आईच्या प्रेमापुढे, मायेपुढे सगळी नाती फेल ठरतात, असं म्हणलं जातं. आपल्या लेकरांसाठी आयुष्यभर राबणाऱ्या माऊलीइतकं निस्वार्थ प्रेम कुणीच करत नाही. परंतु गुजरातमध्ये माय-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक अन् तितकीच मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये पोटच्या लेकरानेच आपल्या आईला संपवल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे नंतर त्याने सॉरी आई मी तुला मारलं, असा स्टेटसही ठेवला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

पोटच्या लेकानेच आईला संपवलं!

समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या राजकोटमधील ही धक्कादायक घटना आहे. राजकोटमध्ये सरकारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या नीलेश नावाच्या तरुणाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली. आईच्या आजारपणामुळे त्या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. याच वादातून तरुणाने आपल्या आईला संपवलं. याबाबत शेजारील व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचून ४८ वर्षीय ज्योतिबेन गोसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी नीलेशची चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली.

काय आहे संपूर्ण घटना?

राजकोट पश्चिम क्षेत्राच्या एसीपी राधिका भारद्वाज यांनी सांगितले की, भारत नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. निलेशने आईची हत्या केल्याची माहिती त्याने फोनवर दिली होती. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचून ४८ वर्षीय ज्योतिबेन गोसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी नीलेशची चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली.

हत्येनंतर ठेवली स्टोरी!

पोलिसांनी आरोपी नीलेशकडे चौकशी केली असता त्याला आईच्या आजारपणामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगितले. यालाच कंटाळून तो स्वत: चाकूने आत्महत्या करणार होता पण त्याच्या आईने त्याला अडवून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. यानंतर आरोपी नीलेशने चादरीने आईचा गळा आवळून आईचीच हत्या केली. यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक स्टेटस देखील पोस्ट केले ज्यामध्ये त्याने आईसोबतचा एक फोटो शेअर करत 'माफ कर आई मी तुला मारले, मला तुझी आठवण येते. ओम शांती.' अशी इन्टाग्रामवर एक स्टोरीही ठेवली.

दरम्यान, आरोपी नीलेशची आई ज्योतीबेन या अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. नीलेशच्या वडिलांनीही त्याला आणि ज्योतीबेनला २० वर्षांपूर्वी सोडून दिले होते. त्यानंतर आई आणि मुलगा एकटेच राहत होते. नीलेशच्या म्हणण्यानुसार, ज्योतिबेन यांनी सुमारे एक महिन्यापासून औषधेही घेणे बंद केले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. या कारणावरून आई आणि मुलामध्ये दररोज भांडण व्हायचे. याच वादातून त्याने आईची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT